Ticker

6/recent/ticker-posts

म.सा.प.निवडणुकीत ठाले पाटलांचा संपूर्ण पॅनल प्रचंड बहुमताने विजयी ....................... साहित्यिक अनंत कराड,प्राचार्या दिपाताई क्षीरसागर,दगडू लोमटे विजयी

आष्टी (वार्ताहर) गेल्या महिनाभरापासून मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर कार्यकारी मंडळ निवडणूकीची धामधूम सुरू होती. दि.१० ऑक्टोबर ते दि.८ नोव्हेंबरपर्यंत एकूण ३०७० मतदारांपैकी २५३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दि.९ नोव्हेंबर रोजी साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात सकाळी ९ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. एकूण ६ फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या मतमोजणीत ठाले पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती.संपूर्ण प्रक्रिया पुर्ण होऊन निकाल हाती येण्यास सायंकाळचे ७ वाजले होते. प्राचार्य कौतिकराव ठाले यांच्या संस्थावर्धक अराजकीय पॅनलमधील सर्व (२२) विजयी उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे - कांबळे ऋषीकेश भीमराव २३७६, लोमटे आसाराम मारोतराव २३७३, ठाले पाटील कौतिकराव तोताराम २३७०,फुलारी देविदास २३६४, अतकरे के.एस. २३६३, क्षीरसागर दीपा भारतभूषण २३५९, तडेगावकर संजीवनी पंडितराव २३५७, गोरे दादा २३४२, लोमटे दगडू बाबूराव २३४२, तांबे संतोष श्रीमंतराव २३३८, कोळकर सुभाष वामनराव २३३५, काळुंखे रामचंद्र विश्वनाथ २३३३, देशपांडे सरोज चंद्रकांत २३३०, मोहिते गणेश आसाराम २३३०, सगर किरण विठ्ठलराव २३२०, तावडे नितीन शिवाजीराव २३१८, जाधव जयद्रथ सुभाषराव २३१७, तिरूके रामचंद्र पंढरीनाथ २३१५, पाटील-हिंगमिरे हेमलता बापुराव २३१५, कराड अनंत भगवान २३१२, कुलकर्णी संजीव तुकाराम २३१०, वाबळे नामदेव राघेजी २२६९ बीड जिल्ह्यातील एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड (शिरूर कासार),प्राचार्य दीपा क्षीरसागर (बीड) आणि दगडू लोमटे (अंबाजोगाई) हे तीनही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल एकता फाउंडेशन, मराठवाडा साहित्य परिषद,विविध शिक्षक संघटना,पत्रकार संघ, कालिकादेवी सहकारी पतसंस्था आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. "राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मतदारांनी केले मतदान" ------------------------------------------- या निवडणुकीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील मतदारांसह राज्यातील अहिल्यानगर,कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव, ठाणे, धुळे, नागपूर,नाशिक, पालघर,पुणे, बुलढाणा,मुंबई,यवतमाळ, रत्नागिरी, वर्धा, वाशिम, सांगली,सातारा,सोलापूर याही जिल्ह्यातील आणि आंध्रप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश या राज्यातील तसेच, अमेरिका, यु.ए.ई.या देशातील मतदारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या