आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी विधानसभा मतदार संघात बोगस कामे करुन भ्रष्टाचार होत आहे.समोरिल उमेदवार हे तर भ्रष्टाचाराचे महामेरु आहेत त्यामुळे भ्रष्टाचार संपविण्याठी आणि आष्टी विधानसभा मतदार संघातील दहशतवाद निपटून काढण्यासाठी सज्ज हावे असे आवाहन अपक्ष उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथील बाजार तळावर आयोजित प्रचार शुभारंभाच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती ॲड.साहेबराव मस्के होते.याप्रसंगी व्यासपीठावर सौ. दमयंतीताई धोंडे, युवा नेते डॉ. अजयदादा धोंडे,जेष्ठ नेते लालाभाऊ कुमकर,उपसभापती पांडुरंग नागरगोजे, जि.प.सदस्य रामराव खेडकर,रामदास बडे,वर्षाताई माळी, अशोक सवासे, ॲड.रत्नदीप निकाळजे, अभयराजे धोंडे,बबन औटे,माजी सरपंच बाळासाहेब पवार,माजी सभापती सौ.सुवर्णाताई लांबरुड,रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,विठ्ठलराव बनसोडे,माजी सभापती नियामत बेग,सरपंच दादासाहेब जगताप, पांडुरंग गावडे,हरिभाऊ जंजिरे,किशोर खोले, राजपाल शेंडगे,गौतम ससाणे,दिलीप काळे, माऊली पानसंबळ, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,देविदास शेंडगे,ॲड.मोहन खेडकर, ज्ञानदेव केदार, दिलीप म्हस्के, युवराज सोनवणे उपस्थित होते.प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करीत नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रस्ताविक ॲड.रत्नदीप निकाळजे यांनी केले. सरपंच दादासाहेब जगताप,भटके विमुक्तांचे पाटोदा तालुक्यातील नेते राजपाल शेंडगे,गौतम ससाणे,बाळासाहेब पवार,माऊली पानसंबळ,अशोक दहिफळे, महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाऊस,माजी सभापती सुवर्णाताई लांबरुड, धनगर समाजाचे नेते देविदास शेंडगे,पांडुरंग गावडे, कु.योगिता गवळी, रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,अशोक सव्वाशे, माजी सभापती नियामत बेग, पांडुरंग नागरगोजे, रामराव खेडकर, लालासाहेब कुमकर,अजयदादा धोंडे यांची भाषणे झाली.
यावेळी बोलताना धोंडे म्हणाले की, जलजीवन कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे असा घणाघाती आरोप माजी आ.भीमराव धोंडे यांनी विरोधकांवर केला. मतदारसंघात त्यांना भ्रष्टाचाराचे महामेरू म्हणून ओळखले जाते अशी टीकाही त्यांनी केली.माझ्या आमदारकीच्या काळामध्ये मी रस्ते, पिण्याचे पाणी,पाझर तलाव अशी अनेक विकासाची कामे केली. मतदार संघात १ हजार पाझर तलाव बांधले. कोणावरही अन्याय झाला तरी आम्ही त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी धावून जाऊ मात्र त्यासाठी आपल्याला ही निवडणूक अत्यंत बहादुरीने लढावी लागणार आहे. ही निवडणूक तशी सोपी नाही मात्र निवडणूक जनतेने हातात घेतली आहे.त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. सकाळी दहा वाजल्या पासूनच आष्टी,पाटोदा, शिरूर तालुक्यातील जनसमुदाय आष्टीकडे येत होता.त्यामुळे नगर - बीड रस्त्यावर मोठ्या संख्येने चारचाकी व दुचाकी वाहनांची गर्दी झाली होती. दुपारी १२ वाजल्या पासून प्रमुख कार्यकर्ते व मतदार संघातील लोकांसह माजी आ.भीमराव धोंडे यांच्यासह कार्यकर्ते यांचा रोड शो झाला. रोड शोमध्ये मतदार संघातील अठरा पगड जातीचे लोक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. ढोल,ताशा व हलगीच्या तालावर आपापल्या हातातील झेंडे मिरविणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विविध वाहनांचा ताफा, विविध रंगाचे झेंडे, कार्यकर्त्यांची झुंबड, लोकांची गर्दी,शिट्यांचा आवाज आणि महिलांची सभेला लक्षणीय उपस्थिती होती.रोड शोमध्ये कार्यकर्त्यांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे व लोकनेत्या पंकजा मुंडे यांचे फोटो घेऊन मिरवत होते.
अध्यक्षीय भाषणात ॲड.साहेबराव म्हस्के म्हणाले की,२००९ साली लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात असणाऱ्या माणसाला भाजप पक्षाने उमेदवारी दिली.धोंडेसाहेबांनी आतापर्यत भाजपचे आदेश पाळलेले आहेत. सध्या भाजप पक्ष आंधळा झाला आहे.आ.पंकजाताई मुंडे यांना पक्षात मोठे स्थान राहिलेले नाही.
मी भाजपाचा तालुकाध्यक्ष असलो तरी ते पद मोठे मानत नाही.पंकजाताई आमची पार्टी तर धोंडे हा आमचा पक्ष आहे. तालुकाध्यक्षपदाचा आता राजिनामा देतो.आमदार हा तालुक्यात भांडणे लावण्यासाठी नसतो. विकासकामे करण्यासाठी असतो. धोंडेसाहेबांच्या आमदारकीच्या काळात आष्टी पोलीस ठाण्यात सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद झाली म्हणून पोलीस ठाण्याला आयएसओ मानाःकन मिळाले होते.भुमीबचाव आंदोलन ,आष्टी ते दिल्ली पदयात्रा,कुकडी पाण्यासाठी आष्टी ते मुंबई शेतकऱ्यांचा मोर्चा धोंडेसाहेबांनी केला.वास्तविक पाहता लोणी ते खडकत पट्ट्यातील शेतकरी व मतदारांनी एकमुखी धोंडेसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन उतराई केली पाहिजे.पंकजाताई मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागलेला आहे. आता बदला घेण्याची वेळ आलेली आहे असे ॲड.म्हस्के म्हणाले.
उपसभापती पांडुरंग नागरगोजे यांनी सांगितले की,२००९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी आ.भीमराव धोंडे यांनी सहकार्य केले इतर कोणीही सोबत नव्हते. भीमराव धोंडे यांनी मुंडे घराण्याशी कधीही विश्वासघात केला नाही. ज्यांनी स्व.गोपीनाथराव मुंडे,आ. पंकजाताई ताईंना त्रास दिला त्यांच्या बदल्याची निवडणुक आहे. खरोखरच पाटोदा तालुक्यातील रस्ते विकास माजी आ.भीमराव धोंडे यांनी केला. युवा नेते अजयदादा धोंडे यांनी सांगितले की, आपली शिट्टी २३ नोव्हेंबर पर्यंत वाजली पाहिजे आणि २३ नोव्हेंबरला आपल्याला विजयाचा गुलाल घ्यायचा आहे. तरुणांनो आपापले बुथ व्यवस्थित सांभाळा,काही अडचण आल्यास थेट मला संपर्क करा.प्रस्ताविक करताना ॲड.रत्नदीप निकाळजे यांनी सांगितले की, असाच उत्साह आपल्यात ठेवा व शिट्टीचा आवाज विधानसभेत पाठवा, सरपंच दादासाहेब जगताप यांनी सांगितले की,आजच विजय झाला आहे एवढी प्रचंड सभा आहे.राजपाल शेंडगे म्हणाले की,आपले उमेदवार स्वच्छ,शांत स्वभावाचे आहेत. येणारा काळ संघर्षाचा आहे त्यामुळे अजयदादा यांनी वाल्मिक कराड व्हावे. माजी सरपंच बाळासाहेब पवार यांनी सांगितले की, मतदारसंघात विकास व शांतता ठेवण्यासाठी भीमराव धोंडे यांना आमदार करा.माऊली पानसंबळ यांनी सांगितले की,एवढी गर्दी हिच विजयाची नांदी आहे.माजी जि. प. सदस्य अशोक सवासे यांनी सांगितले की, आपल्यासाठी चांगले वातावरण आहे आपला विजय निश्चित आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितले की,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार पाडा. जि.प.सदस्य रामराव खेडकर यांनी सांगितले की, राज्यात अपक्षांचे सरकार येणार आहे. माजी आ.धोंडे यांनी कधीही कोणाला त्रास दिला नाही म्हणून त्यांना मतदान करा. भीमराव धोंडे हे कोणालाही धोका देणारे नाहीत.माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण यांनी सांगितले की, मतदारसंघात काही उपद्रवी लोक आहेत त्यांना वेळीच रोखले पाहिजे.रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांनी सांगितले की,ना.रामदास आठवले व जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे माझ्या हृदयात आहेत.माजी सभापती सुवर्णाताई लांबरुड या म्हणाल्या की,या निवडणुकीत माजी आ.भीमराव धोंडे यांना साथ द्या,लोकसभा निवडणुकीतील विश्वासघात जनता विसरली नाही.युवा नेते अशोक दहिफळे यांनी सांगितले की,सध्या कोठेही जा पण २० तारखेला एकत्र या.
सभेस माजी जि.प.सदस्य सतिषमामा झगडे,मोहन घुले, काकासाहेब लांबरुंड, भगवान तळेकर,विकी शेकडे,मुरलीधर पाचे, सुदाम झिंजुर्के,तुकाराम चव्हाण,नईम शेख, संजय कांकरिया, सरपंच सावता ससाणे,दादासाहेब विधाते, युवराज कटके,आस्ताक शेख,सरपंच अभय गर्जे, हादी शेख,आण्णासाहेब लांबडे,केदार जगताप, झुंबर चव्हाण,बाबुराव कदम,संजय सानप, अरुण सायकड, महारूद्र खेडकर एकलव्य संघटनेचे रावसाहेब पिंपळे,सुधीर ढोबळे, आजिनाथ गवळी, चेअरमन दादासाहेब हजारे,आस्ताक शेख, हादी शेख यांच्या सह प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. मतदार संघाच्यावतीने अपक्ष उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे,सौ. दमयंतीताई धोंडे, अजयदादा धोंडे व इतर प्रमुख कार्यकर्त्यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.निलेश दिवटे यांनी सूत्रसंचालन केले.प्रकाश बडे यांनी आभार मानले.
-------------------------
क्षणचित्रे
----------------




*आम्ही " दगाफटका " कुठपर्यत सहन करायचा? मला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत,धोंडेसाहेबांना विधानसभा निवडणुकीत आणि पंकजाताई यांना लोकसभा निवडणुकीत दगाफटका देणारे कोण ? मतदार व मुंडे समर्थकांनी हेरलेले आहे असे यावेळी ॲड.म्हस्के म्हणाले.
*पंकजाताईला रडायला लावले त्याची खादखद विधानसभा निवडणुकीत काढु असे अशोक दहिफळे म्हणाले.
*या प्रचार सभेत कडा येथील सुधीर ढोबळे, परमेश्वर खेडकर, सतिशभैय्या आंधळे, विष्णू गोल्हार,राजु गावडे,बापु मेरगळ, संपत खुरंगे,साईनाथ मेरगळ, ॲड.संभाजी दहातोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी माजी आ.भीमराव धोंडे यांच्या गटात प्रवेश केला.
*उपद्रवी माणसाला त्याची त्याला जागा दाखवुन द्यावी.उपद्रवी माणसाचा चौरंग तर धोंडेसाहेबांची मतदारांनी तळी उचलावी असे मुर्शदपूरचे माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण यावेळी म्हणाले.
*सकाळी ११ वाजल्या पासूनच आष्टी, पाटोदा,शिरूर मतदार संघातील लोक आष्टी येथील प्रचार सभेसाठी निघाले होते.त्यामुळे नगर - बीड रस्त्यावर मोठ्या संख्येने चारचाकी व दुचाकी वाहनांची गर्दी झाली होती.दुपारी १२ वाजल्यापासून प्रमुख कार्यकर्ते व मतदार संघातील लोकांसह उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे यांच्यासह वाजत गाजत मिरवणूक निघाली होती.या मिरवणुकीमध्ये मतदार संघातील अठरा पगड जातीचे लोक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.ढोल ताशा व हलगीच्या तालावर आपापल्या हातातील झेंडे मिरविणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
*डाॕ.अजयदादा धोंडे तुम्ही वाल्मिकआबा कराड व्हा... लोकनेते मुंडेसहेब यांनी लायकी नसणाऱ्यांना आमदार केले होते.पंकजाताईच्या पराभवाचा आम्ही बदला घेणारच असे राजपल शेंडगे यावेळी म्हणाले.
*विविध वाहनांचा ताफा,विविध रंगाचे झेंडे,कार्यकर्त्यांची झुंबड,लोकांची गर्दी शिट्यांचा आवाज आणि महिलांची सभेला असलेली लक्षणीय उपस्थिती होती.
*सभेच्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे व लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे फोटो मिरवत होते.
*महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करून माजी आ. भीमराव धोंडे यांच्या हस्ते प्रचार शुभारंभाचा नारळ वाढविण्यात आला.
*या विराट सभेस ५० हजार जनसमुदाय उपस्थित होता.
*समरोपप्रसंगी उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे यांच्या प्रचार गीताचे लोकार्पण करण्यात आले.
---------------------------
0 टिप्पण्या