
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातुन मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवत आहे.आज बुधवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी
आष्टी येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे.मतदार संघातील मतदार बंधू भगिनींनी प्रचंड संख्येने या जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.
प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने आष्टी येथील आण्णाभाऊ साठे चौक, लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनिमंदीर,कमानवेस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,महावीर चौक, महात्मा फुले चौकातून बाजारतळ अशी रॅली काढण्यात येणार आहे. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा होणार आहे.मी २० वर्षे आमदार असताना आष्टी मतदार संघाचा सर्वांगीण विकास केलेला आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी कधीही जातीयवाद केला नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकास कामे केली आहेत.सुरुवातीला १५ वर्षं आणि २०१४ ते २०१९ असे ५ मिळून २० वर्षे मतदारसंघाचे नेतृत्व करीत मतदार संघासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आणून विकास केला आहे.मतदार संघातील एकही गाव असे नाही की, त्या गावांसाठी निधी दिलेला नाही.विकासकामे करताना कधीही भेद केला नाही.त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून गावागावात शाळा सुरू केल्या आहेत.ऊसतोड मजूर, शेतमजूर,शेतकरी, कष्टकऱ्यांची मुले,मुली शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय करीत आहेत. प्रचाराचा शुभारंभ आज आष्टी येथे होत आहे. मतदार संघातील बंधू व भगिनींनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अपक्ष उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या