Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे सुपुत्र बजरंग बनसोडे यांना भारत सरकारकडून केंद्रीय गृहमंञी दक्षता पदक जाहीर

आष्टी( प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील सुपुत्र व सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) दिल्ली येथे केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेले अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांना त्यांचे उत्कृष्ठ कामगिरीसाठी गृहमंत्रालय, भारत सरकार यांचेकडुन सन २०२४ चे 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक' जाहीर झाले आहे. बजरंग बनसोडे हे महाराष्ट्र पोलीस दलातील 'पोलीस अधिक्षक' (एस.पी.) दर्जाचे अधिकारी असुन, सन २०२२ पासुन ते राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च तपास यंञणा असलेल्या 'राष्ट्रीय तपास यंत्रणामधे प्रतिनियुक्तीवर कर्तव्य बजावत आहेत.राष्ट्रविरोधी व दहशतवादी कृत्यांमध्ये सामील असलेल्या असामाजिक घटकांविरूद्ध 'स्पेशल ऑपरेशन्स' राबवुन केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीसाठी बनसोडे यांना केंद्रीय गृहमंञी दक्षता पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. आतंकवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी 'राष्ट्रीय तपास यंञणाची स्थापना सन २००८ मध्ये मुंबई येथे झालेल्या २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आलेली आहे.ही एक सर्वोच्च केंद्रीय तपास यंञणा आहे.एनआयएचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. NIA दहशतवाद, बंडखोरी, देशाचे सार्वभौमत्व,अखंडता आणि सुरक्षिततेशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणे, राज्य पोलिस दल आणि दहशतवादविरोधी इतर एजन्सींसोबत समन्वय राखणे, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करणे आणि त्यानुसार ऑपरेशन्स राबविणे, देश व राज्यांच्या सीमा ओलांडून दहशतवाद आणि देशविरोधी गुन्ह्यांशी संबंधित तपास करते अशा महत्त्वपूर्ण कार्यामधे आणि ऑपरेशनस् मध्ये बजरंग बनसोडे यांनी गेल्या दोन वर्षापासून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यामुळे त्यांना भारत सरकारच्या गृह विभागाने केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर केले आहे.त्याबद्दल बनसोडे यांचे सर्व स्तरातुन कौतुक होतं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या