
२० वर्षं विधानसभा सदस्य असताना मतदार संघात पाझरतलाव, गावागावात रस्ते व शैक्षणिक संस्थाचे जाळे निर्माण करुन शैक्षणिक विकास केला असे माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले.
माजी आ.भीमराव धोंडे हे प्रत्येक वर्षी दिवाळी पाडवा रुई नालकोल येथे साजरा करतात. ग्रामस्थांनी माजी आ. भीमराव धोंडे यांचे रुई नालकोल येथे वाजतगाजत स्वागत केले.प्रारंभी शेख महंमद महाराज देवस्थानचे दर्शन घेतले. महेश मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीत गावातील एकही मत विरोधात जाणार नाही असे आश्वासन ग्रामस्थांनी दिले.महेश विद्यालयातील स्व. बाबाजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील महेश विद्यालयात रुईनालकोल व परिसराच्या गावातील कार्यकर्ते बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.आश्राजी महाराज आजबे हे होते.
व्यासपीठावर डाॕ. अजयदादा धोंडे,माजी जि.प.सदस्य गंगाधर आजबे, ह.भ.प. दिनकरराव तांदळे,माजी पं.स.सदस्य संदीप आस्वर,माजी सरपंच बबन औटे,विठ्ठलराव बनसोडे,आण्णासाहेब लांबडे,माजी सरपंच दिपक खिळे,शांतीलाल रेपाटे,दिलीप काळे, बाबु कदम,चेअरमन महादेव आजबे,अमोल औटे, माजी सरपंच महादेव औटे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगितले की, गावातील महादेवाला नतमस्तक होऊन आशिर्वाद घेऊन कामाला सुरुवात केल्यानंतर प्रेरणा मिळते.माझ्या राजकीय जिवनात मित्रांनी मला भरपूर सहकार्य केले. मतदारसंघात शैक्षणिक कामे केली,पाझर तलाव केले.येत्या दिड दोन वर्षांत खुंटेफळ साठवण तलावात पाणी येणार आहे.हा परिसर दुष्काळमुक्त होईल.माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी सुरुवातीला मराठवाड्यासाठी कृष्णा खोऱ्याचे २५ टी.एम. सी.पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडच्या काळात मतदार संघात बोगस कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. जलजिवन योजना एकाही गावात पुर्ण झाली नाही.अशा प्रकारची सरकारी लूट थांबविण्यासाठी मला साथ द्या.आता वातावरण चांगले आहे. मतदार संघात फिरलो आहे.युवा नेते अजयदादा धोंडे यांनी सांगितले की, जनता आपल्या सोबत आहे.आता निवडणुकीतून माघार नाही.त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.शिक्षण संस्थेचे माध्यमातून गोरगरिबांची मुले शिकली व नोकरीस लागली आहेत.माजी जि.प.सदस्य गंगाधर आजबे यांनी सांगितले की, आम्ही कोणाला घाबरत नाहीत.चार तारखेनंतर आम्ही योग्य निर्णय घेऊ.दिलीप काळे यांनी सांगितले की,यश आपलेच आहे फक्त सर्व ताकदीनिशी पाठीमागे उभे रहा.सरपंच सावता ससाणे यांनी सांगितले की,माजी आ.भीमराव धोंडे हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येणार आहेत.अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारा नेता आहे. गौतम ससाणे म्हणाले की,मतदार संघात माजी आ.भीमराव धोंडे यांच्या रुपाने सुप्त लाट आहे. माजी सरपंच दिपक खिळे यांनी सांगितले माजी आ.भीमराव धोंडे म्हणजे हिमालया सारखी उंची असणारा माणूस आहे ते खरोखरच विकास पुरुष आहेत. आश्राजी महाराज आजबे म्हणाले की, आपल्यासाठी साहेब हेच चिन्ह आहेत. ते प्रामाणिक नेते आहेत त्यामुळे त्यांना मतदारांची साथ आहे.माजी सरपंच बबनराव औटे यांनी सांगितले की, माजी आ. भीमराव धोंडे यांनी गेल्या चार महिन्यांपासून मतदार संघात फिरुन लोकांच्या समस्या जाणून घेत राजकीय मशागत केली आहे. त्यांना निश्चितच फायदा होईल.प्रास्ताविक करताना सरपंच तात्यासाहेब नालकोल यांनी सांगितले की, मतदार संघाला माजी आ.भीमराव धोंडे यांची गरज आहे.तुम्ही मंत्री होणार आहात. मतदार संघात सर्वांगीण विकास केला आहे. आता तरुणाई आपल्या पाठीशी आहेत. प्रचाराचा नारळ फोडण्याच्या दिवशी त्यांची राजकीय ताकद मतदार संघाला कळणार आहे.
याप्रसंगी गंगाआबा आजबे,माजी जि.प. सदस्य सतिषमामा झगडे, माजी सरपंच दिपक खिळे,बाबुराव कदम,माजी पं स.सदस्य संदीप आस्वर यांची भाषणे झाली. कार्यक्रमास डॉ.अमरिश गाडे,अभयराजे धोंडे, चेअरमन राजेश धोंडे, संपत लांबडे,विजय सांगळे,संपत काळे, मुकेश बोडखे,संभाजी पांडूळे,माजी सरपंच राधाकृष्ण औटे, उपसभापती नामदेव धोंडे,चेअरमन पांडुरंग धोंडे,नरेंद्र औटे,कचरु भुकन,कुंडलिक आस्वर, पांडुरंग कर्डिले महाराज, छगन खोडके,आजिनाथ भोसले,अशोक मिसाळ, प्रशांत ओटे,गहिनीनाथ खोटे,मोहन नरुटे, जगन्नाथ भुकन,बाबुराव औटे,रामकृष्ण ओटे, भास्कर ओटे,गणेश सुंबरे,आप्पासाहेब औटे, अनिल गजघाट,विठ्ठल लांडगे,संजय काळे, विशाल काळे, सोनाजी गांजुरे, महेंद्र जगताप, माजी सरपंच करडूळे, संजय तरटे,अन्सार भाई, बबन ननावरे,रमेश जाधव,रघुनाथ शेंडगे, राजाराम ननावरे, दिपक झांबरे, गोरक्षनाथ तावरे, माजी सरपंच दिपक कावरे,दिपक झांबरे, सचिन पांडूळे,लक्ष्मण झगडे, किरण सुद्रीक, देविदास परकाळे, अभिजित काळे, तान्हाजी आस्वर,बबन खरपुडे,चेअरमन शरद नालकोल,महादेव आजबे,रंगनाथ बोडखे, राजु रासकर,चेअरमन दादासाहेब हजारे, राहुल ढोबळे,रामदास खिळे, शोभाचंद ससाणे,अंकुश खिळे,जाकिर शेख, रामेश्वर भुकन,महादेव भुकन यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन माजी सरपंच संजय नालकोल यांनी केले.
0 टिप्पण्या