Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी ,मुर्शदपूर शहर " शिट्टी " च्या आवाजाने दणाणले....तीन तास डोअर टु डोअर फिरले उमेदवार भीमराव धोंडे

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ मुर्शदपुर व आष्टी शहरात तीन तास प्रचार फेरी झाली. संपुर्ण आष्टीशहर, विनायकनगर आणि मुर्शदपुर " शिट्टी " च्या आवाजाने दणाणून गेले.‌ मतदार संघातील शिरूर, कडा,धामणगाव,लोणी, पिंपळानंतर आष्टी मुर्शदपुरमध्ये भव्य प्रचार फेरी झाली.‌शिराळफाटा चौकातील लिमटाका गणपतीचे दर्शन घेऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या फेरीस प्रारंभ झाला.माजी आमदार भीमराव धोंडे,युवराज अभयराजे धोंडे, नियामत बेग,माजी सभापती ॲड.साहेबराव म्हस्के,माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,अशोक साळवे, ॲड.रत्नदीप निकाळजे, बाबु कदम,सदा पटील दिंडे, विठ्ठलराव बन्सोडे, दिलीप काळे,उत्तम बोडखे,चेअरमन अरुण सायकड,बब्बर खाॕन, शेख अफसर,मतीन शेख,रेहान बेग,अस्ताक शेख,सय्यद रिजवान, बाबा गर्जे, कुंडलीक आस्वर,संदीप पगारे, सय्यद निसार, ईब्राहम खान,लड्डुभाई पठाण,शेख फजल,शेख आदि,माजेद खाॕन गौतम ससाणे बाबा ससाणे, आदेश निमोणकर यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मतदार आणि व्यापाऱ्यांना भेटून " शिट्टी " चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करीत होते. व्यापारी आणि ग्रामस्थांनी ठिकठिकाणी माजी आमदार भीमराव धोंडे यांचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले.सायकड गल्लीतील जगदंबा मातेचे मंदिर ट्रस्टच्या वतीनेही स्वागत करण्यात आले.आष्टी आणि मुर्शदपुर विकासासाठी मला विधीमंडळात पाठवणे गरजेचे आहे. सर्वत्र शिट्टीचाच आवाज घुमत आहे असे उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या