


आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे.प्रचाराचा धुराळा उडाला आहे. सभा,बैठका आणि मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. अपक्ष उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे यांच्या पत्नी सौ.दमयंती भीमराव धोंडे यांनीदेखील प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.ठिकठिकाणी महिलांची फेरी काढत घराघरात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. आष्टी, पाटोदा,शिरूर मतदार संघातील भाजपाचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी चार टर्म आमदारकी भूषविली आहे. यावेळी ते शिट्टी चिन्ह घेत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.त्यांच्या प्रचारार्थ पत्नी सौ. दमयंतीताई धोंडे सून सौ.अक्षदा धोंडे यांच्यासह चिरंजीव अजय धोंडे व अभय धोंडे हेदेखील अगोदरच प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. सौ.दमयंती धोंडे यांनी तालुक्यातील कडा, धानोरा,साबलखेड येथे महिलांच्या फेरी काढत घरोघरी जाऊन प्रचार करीत शिट्टी या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले.याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. नागरिकांच्या प्रतिसादामुळे निवडणूक आता जनतेनेच हातात घेतल्याचे चित्र आहे. भीमराव धोंडे हे शिट्टी या चिन्हावर मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचे मतदारांत बोलले जात आहे.धानोरा येथील रॅलीमध्ये सुरेखा शेळके, सविता धोंडे,कमा पठाण,जया गायकवाड, शबाना सय्यद,रेखा शेळके,अंजना गिरी, शबाना शेख,रत्नमाला तरटे,कविता गाडे, रुक्साना शेख,ठकुबाई गाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला व कार्यकर्त्यांनी यावेळी सहभाग घेतला होता.
0 टिप्पण्या