
आष्टी (प्रतिनिधी)
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य
व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली,मुंबई विभाग यांच्या संयुक्त
विद्यमाने अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील
अबिटखिंड गावात पर्यावरण मंडळाच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात पर्यावरण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागत
सोहळ्यातून गावाच्या समृद्ध परंपरा आणि आदरातिथ्याचे दर्शन घडले.विशेषत: पर्यावरण
रक्षणासाठी गावकऱ्यांनी घेतलेल्या पुढाकाराने उपस्थित सर्व पर्यावरणप्रेमींना
प्रेरणा मिळाली.या उद्घाटनप्रसंगी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण
मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,
भविष्यात मानव जातीला प्रदूषण विरहीत ऑक्सिजन मिळवण्यासाठी पर्यावरण चळवळ घरोघरी
पोहचवणे आवश्यक आहे. अबिटखिंड गावाप्रमाने गावोगावी पर्यावरण प्रेमींनी विशेषता
युवकांनी पुढाकार घेऊन आपली गावे वनराईने नटविली पाहिजे. अबिटखिंड या गावाचा आदर्श
घेऊन प्रत्येक गावात पर्यावरण शाखा तयार करून निसर्ग संवर्धनाचे विविध उपक्रम
राबवून गाव सुजलाम सुफलाम केले पाहिजे. यासाठी आपली संस्था त्यांना वेळोवेळी आवश्यक
ती मदत आणि मार्गदर्शन करेल याप्रसंगी या कार्यक्रमासाठी सचिव वनश्रीताई मोरे,
कार्याध्यक्ष छायाताई राजपूत, प्रा.डॉ.प्रविण गुणवरे,नायब तहसिलदार बेरड,महापौर
पिंपरी चिंचवड शकुंतला धराडे,तुकाराम अडसुळ,प्रकाश केदारी,संजय कारखिले, राजेंद्र
आहेर, स्वातीताई आहिरे,संजय गायकवाड आणि सौ.मिनाक्षी मोरे, अनेक पर्यावरणप्रेमींची
उपस्थिती होती. समस्थ ग्रामस्थ मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे ,विजय घनकुटे, गोविंद
घनकुटे, सुधाकर गोडे, मुरलीधर गोडे,किसन भांडकोळी,सुनिल शिंदे,शंकर गोडे, आनिल
भोजने,सुनिल भोजने आदि ग्रामस्थ उपस्थित होते.याप्रसंगी बाळासाहेब ढोले,सरपंच आंबी
खालसा,वनश्री ताई मोरे,राजश्री आहेर,रामेश्वर चेमटे,राम वाकचौरे या
पर्यावरणप्रेमींना सह्याद्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी
रामनाथ भोजने साहेब,प्रा.चंद्रकांत भोजने,भैरवनाथ सेवा मंडळ नोकरदार ग्रामीण व
शहरी, ग्रामपंचायत अबिटखिंड ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या