Ticker

6/recent/ticker-posts

सावरगाव घाट दसरा मेळाव्याच्या पुर्वतयारीची माजी आ.भीमराव धोंडे यांच्याकडून पाहणी

आष्टी (प्रतिनिधी) राष्ट्रसंत भगवानबाबांची जन्मभुमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगड दसरा मेळाव्याच्या निमित्ताने माजी आ.भीमराव धोंडे यांनी शुक्रवारी पुर्व तयारीची पाहणी केली. यावर्षीचा सावरगाव येथील दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे,पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये दोघे बहिणभाऊ समाज बांधवांना काय संदेश देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दसरा मेळावा हा जसा सामाजिक एकत्रिकरणाचा महत्त्वाचा प्रसंग असला तरी या माध्यमातून राजकारणाची गणिते ठरवली जातात.त्यामुळे या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.राज्यातील व राज्याबाहेरील भगवानबाबा भक्तांना भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आ. भीमराव धोंडे यांनी केले आहे.यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे,माजी सभापती काकासाहेब लांबरुड, अभयराजे धोंडे,संतोष राख,जि.प‌‌‌. सदस्य रामदास बडे, दिलीपराव म्हस्के,संजय कांकरिया, भाऊसाहेब लटपटे, संतोष राख,माजी सभापती अनिल जायभाय, सुदाम सानप, उपस्थित होते. मेळाव्याच्या ठिकाणी भगवानबाबा, लोकनेते गोपिनाथराव मुंडे,आ. पंकजाताई मुंडे यांचे मोठ्या आकाराचे कटआऊट लावण्यात आले आहेत.स्टेजपासून १०० फुट अंतरावर कायम स्वरुपी लोखंडी बॅरेगेट तयार करून त्याची फीटींग करण्यात आली आहे. भगवानबाबा यांच्या भव्य पुतळ्यास रंगरंगोटी करण्यात आली आहे. सावरगाव परिसरात चारशे एकरात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन किलोमीटर अंतरावर भाषण सहज ऐकु जाईल अशा साऊंड सिस्टीमची सोय करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या