

आष्टी( प्रतिनिधी )
सालाबादाप्रमाणे यावर्षी आष्टी वकील संघाची निवडणूक जाहीर झालेली आहे.विविध पदाकरिता उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस काल शुक्रवार दि.११ आक्टोबर हा होता.अंतिम दिवसापर्यत अध्यक्षपदासाठी ॲड. अजय जेवे,ॲड बाळासाहेब झांबरे,ॲड संभाजी दहातोंडे,ॲड नवनाथ विधाते असे चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तर उपाध्यक्षपदासाठी ॲड यासिर सय्यद,ॲड किशोर निकाळजे,ॲड सतीशकुमार गायकवाड असे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.त्याचप्रमाणे सचिवपदासाठी ॲड.यासिर सय्यद,ॲड.किशोर निकाळजे,ॲड.सतीशकुमार गायकवाड,ॲड.नितीन बोडखे, असे चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.कोषाध्यक्षपदासाठी ॲड.संदीप जगताप,ॲड.दिलीप दरेकर असे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तसेच महिला प्रतिनिधी या जागेसाठी ॲड. प्रतीक्षा डावकर,ॲड.अर्चना पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ॲड.मधुकर झांजे,सहाय्यक निवडणूक अधिकारी ॲड.बापुराव गर्जे यांनी दिली.आष्टी वकील संघाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पदासाठी जास्त उमेदवारी अर्ज आल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे.अर्जाची छाननी १४ आक्टोबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दि.१५ ते १७ आक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.उमेदवार यांची अंतिम यादी १७ आक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी मतदान दि.२२ आक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे.मतदान झाल्यानंतर दि.२२ आक्टोबर रोजी लगेच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.आष्टी वकील संघाची निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख १७ आक्टोबर आहे.कोण उमेदवार अर्ज मागे घेणार ? कोण निवडणुक लढणार ? वकील संघाची निवडणुक अविरोध होणार की नाही ? हे १७ आक्टोबर रोजीच कळणार आहे.
0 टिप्पण्या