Ticker

6/recent/ticker-posts

श्रीकृष्ण विद्यालय मातकुळीचा सुरज डोके याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय मुंबई व विभागीय क्रीडा कार्यालय संभाजीनगर महाराष्ट्र शासन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शालेय वुशु क्रीडा स्पर्धेत १७ वर्षाखाली गटामध्ये आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील श्रीकृष्ण विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी सुरज लक्ष्मण डोके याने संभाजीनगर विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.सुरज डोके याची नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. भीमराव धोंडे,प्रशासन अधिकारी डाॕ.डी.बी. राऊत,प्रा.शिवदास विधाते, माऊली बोडखे, संजय शेंडे, शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ सरकाळे, क्रीडाशिक्षक अशोक डोके व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिकांनी अभिनंदन करुन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या