
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी वकील संघाची कार्यकारिणीची सन २०२४- २०२५ या वर्षाकरिता
निवडणूक होत आहे. अध्यक्षपदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
उपाध्यक्षपदासाठी तीन उमेदवारी अर्ज आले होते.सचिव पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल
झाले होते. कोषाध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.महिला
प्रतिनिधीसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या
दिवशी आज गुरुवार दि.१७ आक्टोबर रोजी दुपारी ३ वा. उपाध्यक्ष पदासाठी तीन
उमेदवारापैकी दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे उपाध्यक्षपदी ॲड.किशोर
निकाळजे यांची, सचिवपदासाठी चार उमेदवार अर्जापैकी तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज
मागे घेतल्यामुळे ॲड.यासीर ताहेर सय्यद यांची सचिवपदी,कोषाध्यक्ष पदासाठी दोन
उमेदवारी अर्जापैकी एकाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ॲड.संदीप जगताप यांची तर
महिला प्रतिनिधी या पदासाठी दोन उमेदवारी अर्जापैकी एक उमेदवारी अर्ज मागे
घेतल्यामुळे ॲड.अर्चना चंद्रशेखर पाटील यांची अविरोध निवड करण्यात
आली.अध्यक्षपदासाठी चार उमेदवारी अर्जापैकी वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.नवनाथ
विधाते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारी अर्ज
राहिले असल्याने चुरशीची लढत होणार आहे. अशी वकील संघात चर्चा आहे.
अध्यक्षपदासाठीचे उमेदवार ॲड.अजय जेवे,ॲड.बाळासाहेब झांबरे,ॲड. संभाजी दहातोंडे
यांचे उमेदवारी अर्ज राहिले आहेत.आष्टी वकील संघाचा अध्यक्ष कोण होणार ? याकडे
तालुक्याचे लक्ष लागले आहे.आष्टी वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी दि.२२ आक्टोबर रोजी
मतदान होणार आहे.त्याचदिवशी अध्यक्षपदाचा निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक
निर्णय अधिकारी ॲड.मधुकर झांजे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ॲड.बापुराव गर्जे
यांनी सांगीतले.
0 टिप्पण्या