आष्टी (प्रतिनिधी)
विधानसभा मतदार संघासाठी मंगळवारपासून-
आचारसंहिता लागू झाली आहे.या
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये इतकी राहणार आहे.दरम्यान विधानसभेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १० हजार रुपये इतकी अनामत रक्कम राहणार आहे अशी माहिती सहाय्यकनिवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार वैशाली पाटील यांनी दिली आहे.
आष्टी विधानसभा मतदार संघाची
निवडणुकीच्या निमित्ताने आष्टी येथील तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तहसिलदार वैशाली पाटील बोलत होत्या.त्या पुढे बोलताना म्हणाल्या की,आष्टी मतदार संघात २ लाख ३ हजार ८३८ पुरुष मतदार, १ लाख ९ हजार १९१ स्री मतदार असे एकूण ३ लाख ८३ हजार ३० मतदार आहेत. एकूण ४४० मतदान केंद्र यामध्ये ३७ मतदान केंद्र हे संवेदनशील असल्याची माहिती तहसिलदार वैशाली पाटील यांनी दिली.
0 टिप्पण्या