Ticker

6/recent/ticker-posts

माजी आ.धससाहेब आमची सावड कधी देणार? ............... माजी आ.भीमराव धोंडे

"
आष्टी (प्रतिनिधी) राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि राजकारणात कोणी कोणाचा कधीच कायम शत्रु नसतो.कोण कधी कोणाला विरोध किंवा कोण कोणाला कधी सहकार्य करणार याचा भरवसा नसतो.१५ वर्षे झाले मी २००९ मध्ये दिलेली सावड सुरेशराव कधी फेडणार ? असा सवाल माजी आ.भीमराव धोंडे यांनी केला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने माजी आ.भीमराव धोंडे हे गेल्या दोन महिन्यापासून आष्टी, पाटोदा,शिरूर मतदार संघातील गांवे,वाड्या आणि वस्त्यांवर फिरून लोकांशी संवाद साधत समस्या जाणून घेत आहेत.दोन महिन्यात संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. दौऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी भाषणे केली.आष्टा गटातील काही गावात माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले की, आता १५ वर्षं झालेत मी कडा येथील जाहीर सभेत अंतःकरणापासून घोषणा दिल्या होत्या. माझ्यामुळे त्यावेळी विधानसभा सदस्य झाले.मंत्री झाले.घोषणा दिल्याने अनेक जेष्ठ कार्यकर्ते माझ्यावर नाराज झाले होते काहीजण तर माझ्याबरोबर महिनाभर बोलत नव्हते.एवढे दिवस सावड कोणी ठेवते का ? असा प्रश्न माजी आ.भीमराव धोंडे यांनी उपस्थित केला ? माजी आ. भीमराव धोंडे यांनी हरिनारायण आष्टा गटातील काही गावात फिरुन लोकांशी संवाद साधला. १० ऑगस्ट २०२४ पासून आष्टी शहरापासून गाव भेट दौऱ्याची सुरुवात केली होती.अजुन दोन दिवसाचा दौरा बाकी आहे.उर्वरित सर्व गावे, वाड्या,वस्त्यावर जाऊन नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काय करायचे याबाबत देखील लोकांशी चर्चा केली आहे.जवळपास अख्खा मतदार संघ माजी आ.भीमराव धोंडे यांनी पिंजून काढला आहे.प्रत्येक गाव, वाड्या,वस्त्या येथे माजी आ.भीमराव धोंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, फटाके फोडून तोफा वाजवून स्वागत करण्यात आले.काही गावात बैलगाडीतून, घोड्यावरून,ट्रॅक्टरमधून तसेच डीजे लावून आणि जेसीबीतून फुले उधळवून स्वागत करण्यात आले.मी २० वर्ष विधानसभा सदस्य असताना मतदार संघाचा किती कायापालट केलाय आणि इतर लोकप्रतिनिधींनी किती विकास केला याची तुलना करीत माजी आ.भीमराव धोंडे यांनी लोकांना मी केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगितला.गेल्या पाच वर्षात झालेले रस्ते, जलजीवनची कामे व इतर विकास कामांचा दर्जा काय आहे किती दिवसात रस्त्यावर खड्डे पडले आहेत याची माहिती अनेक गावांतील लोकांनीच जाहिरपणे सांगितली.सोमवारी हरिनारायण आष्टा गटात गाव भेट दौऱ्याचा समारोप झाला. ठिकठिकाणी नागरिकांनी जोरदार स्वागत केले.आष्टा, मातावळी,क-हेवाडी इतर अनेक ठिकाणी नागरिकांनी जेसीबीमधून फुलांची उधळण करीत डी.जे.लावून रथातून मिरवणूक काढून स्वागत केले.मातावळी येथील ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले.भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे,अभयराजे धोंडे,जेष्ठ नेते लालाभाऊ कुमकर, माजी शिक्षण सभापती नियामत बेग,सरपंच विकास पांढरे,रघुनाथ शिंदे,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,पत्रकार उत्तम बोडखे,आजिनाथ गळगटे फौजी,शिवाजी वनवे,राजेश कराड, रघुनाथ शिंदे,माजी सरपंच बळीराम गिते, बबनराव सांगळे,अशोक बांगर,आण्णा बांगर, अजय निंबाळकर, बाबुराव कदम,विकास वनवे,सरपंच बबनराव डोके,झांबरे मुकादम, रघुनाथ पठाडे,संभाजी जगताप,अज्जुभाई, सिद्धेश्वर शिंदे,केदार गिते,सुधाकर डोके, सोमनाथ गिते व इतर अनेक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या