
आष्टी (प्रतिनिधी)
सध्या सोशल मिडिया आणि महागड्या फोनमुळे फोटोग्राफी व्यावसाय
अडचणीत आला आहे.परंतु या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी फोटोग्राफरांनी काळानुसार बदलले
पहिजे.तरच त्यांना आपल्या व्यावसायात यश मिळेल.आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे
अशोक राऊत यांच्या व्यावसायात आणखी प्रगती होईल असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस
यांनी केले. आष्टी शहरातील मुर्शदपुर भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या
अशोक राऊत यांच्या नवीन फोटो स्टुडिओचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी
ह.भ.प.दिनकरराव तांदळे महाराज, जि.प.चे माजी सदस्य खंडुदादा जाधव,धनश्री पतसंस्थेचे
अधिकारी रमेश बोराडे मुर्शदपुर ग्रामपंचायतचे सरपंच अशोक मुळे, नाभिक संघटनेचे
अध्यक्ष प्रविण कदम,प्राचार्य नागसेन कांबळे,माजी उपसभापती आत्माराम फुंदे आदि
मान्यवर उपस्थित होते.गेल्या २१ वर्षापासून फोटोग्राफी करत असलेले अशोक राऊत यांनी
सहा महिन्याच्या बाळापासून ते वयोवृध्दापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान व महागड्या कॅमेरे
उपलब्ध करत फोटोग्राफी केली आहे.पुढे बोलतांना धस म्हणाले की, ज्या क्षेत्रात आपण
काम करतो त्या क्षेत्रात प्रमाणिकपणे व निष्ठेने काम करावे. बदलत्या काळानुसार बदल
करावा लागतो.बदल केला नाही तर तो व्यावसाय अडचणीत येतो.त्यामुळे व्यावसायिकांनी
आधुनिक तंत्रज्ञान वापरून बदल करावा. काळाची पुढील पाऊले ओळखुनच अशोक राऊत यांनी हे
आधुनिक फोटोग्राफी सुरु केली आहे.त्यामुळे त्यांच्या व्यावसायाची आणखी प्रगती होणार
आहे.या कार्यक्रमाचे संचालन बाळासाहेब तळेकर यांनी तर संतोष राऊत यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या