
आष्टी(प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालय शारीरिक शिक्षण विभाग व फिजिओथेरपिस्ट नेचुरूपैथी रिसर्च ट्रीटमेंट पंजीकृत संस्था,जोधपूर यांचे सयुक्त विद्यमाने एक्यूप्रेशर कायरोप्रॅक्टिक थेरपी, नाडी स्टीम थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.दि.११ ते १८ आक्टोबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते १ दुपारी ३ ते ७ वेळेत शिबीर संपन्न होणार आहे.गुरुवारी या शिबिराचे उद्घाटन झाले. उद्घाटक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हरिदास विधाते होते तर उद्घाटक प्राचार्या डॉ.अखिला सय्यद, महिला महाविद्यालय,अंबाजोगाई,प्रमुख अतिथी डॉ.रूपेश पवार,जोधपूर होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.हरिदास विधाते म्हणाले की,आजच्या धकाधकीच्या जीवनात अवेळी जेवन,फास्ट फूड यामुळे अनेक वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. मोठ्याप्रमाणात अॕलोपॅथीक औषधे घेतली जातात.त्याची शरीरावर साईड इफेक्ट होतात.पण या थेरपीमध्ये कुठलेच औषध घेण्याची गरज नाही.त्यासाठी ज्यास्तीत-ज्यात नागरीकांनी या शिबीराचा फायदा घ्यावा .उद्घाटक प्राचार्या डॉ.अखिला मॅडम म्हणाल्या की,धोंडे महाविद्यालयाचा हा समाज उपयोगी उपक्रम आहे.पुर्वीचा लोकांचा आहार सकस होता.पण अलीकडील काळात पिकासाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो.त्यामुळे आजारी लोकांचे प्रमाण वाढते आहे.विविध आजारावर थेरपी उपाय अतिशय उत्तमआहे. प्रमुख अतिथी डॉ.पवार यांचे समयोचित भाषण झाले.याप्रसंगी जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या शिबिरात गोळ्या व औषधांशिवाय फिजिओथेरपी सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जाणार आहेत.ब्लड प्रेशर,कंबरदुखी, गुडघेदुखी,पाठदुखी,मानदुखी,सांधेदुखी, हात-पाय सुन्न होणे,जुनी लखवा,झोप न लागणे, गॅस,अपचन,डोकेदुखी,मधुमेह,रक्तदाब, थायरॉईड,ॲलर्जी खाज,बुरशी,सोराटीका, मूळव्याध या आजारांवर उपचार करण्यात येतील.लठ्ठपणावर उपचार व केस गळणे किंवा कमी वयात पांढरे होणे यावर उपचार केले जातील.महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.आनंदराव धोंडे महाविद्यालय,कडा येथे सात दिवसाच्या शिबिरासाठी २०० रुपये फी आकारली जाईल.या शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.हरिदास विधाते, प्रा. डॉ.बाळासाहेब धोंडे,प्रा.डॉ.भाऊसाहेब काळे,प्रा.डॉ.मुश्ताक शेख,डॉ.रुपेश पवार यांनी केले आहे.
0 टिप्पण्या