

आष्टी (प्रतिनिधी )
आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयामध्ये आज मंगळवार दि.८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वा. भारतातील प्रसिद्ध एम.पी.एस.सी व यू.पी.एस.सी परीक्षेसाठीचे मार्गदर्शक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांचे " मी आय.ए.एस. अधिकारी होणार " या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्याबरोबरच आष्टी तालुक्यामध्ये एम.पी. एससी व यू.पी.एस.सी. चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य तथा प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी केले आहे.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी सांगितले की,धोंडे महाविद्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नोकरी मार्गदर्शन केंद्रांतर्गत वेळोवेळी महाराष्ट्र व भारतातील प्रसिद्ध एम.पी.एस.सी.आणि यु.पी.एस.सी.तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन शिबिर आयोजिन केली जातात.याची फलनिष्पत्ती म्हणजे महाविद्यालयातील अनेक युवक - युवती ग्रामसेवक,तलाठी, कृषीसेवक,पोलीस. मिलिटरी,आयकर अधिकारी,पी.एस. आय.,तहसीलदार,शिक्षणाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी करत आहेत.प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी आजपर्यंत संपूर्ण भारतात १५ हजार कार्यक्रमाचे रेकॉर्ड त्यांनी केले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व यू.पी.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.या संधीचा फायदा परिसरातील एम.पी.एस. सी व यू.पी.एस.सी चा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये शंभर विद्यार्थ्यांची अभ्यासिका गरीब विद्यार्थ्यांसाठी निशुल्क व आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांसाठी नाममात्र शुल्क ठेवून उपलब्ध केले आहे. या अभ्यासिकेचाही फायदा परिसरातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असेही प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी सांगितले.
0 टिप्पण्या