Ticker

6/recent/ticker-posts

भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित रहावे ...................... जिल्हाध्यक्ष मोहन आघाव

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे.विविध जाती धर्म पंथांना जोडण्याचे काम संत भगवान बाबा, संत वामनभाऊ आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी केले. त्यांच्या विचार आणि कार्याला पुढे नेत नतमस्तक होण्यासाठी साहेबांनी आरंभीलेल्या भगवान भक्ती गड येथील दसरा मेळाव्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंजारी सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष मोहनराव आघाव यांनी केले आहे.आज बीड येथे माध्यमांशी बोलताना वंजारी सेवा संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष मोहनराव आघाव म्हणाले, संत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज यांनी समता, बंधुत्व आणि ऐक्याची परिवर्तनाची दिशा समाजाला दिली.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि हिंदुस्तान मध्ये समाज जोडण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्याच विचाराने प्रभावित होऊन त्यांच्या विचार कार्याला पुढे नेण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गड येथे होणाऱ्या भव्य दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंजारी सेवा संघाच्या वतीने आज येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री आणि आमदार गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय पंकजाताई मुंडे, माजी खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्यासह महाराष्ट्रातील मोठमोठे मान्यवर विविध क्षेत्रातील संत महंत उपस्थित राहणार आहेत. भाऊ,बाबांच्या आशीर्वादासाठी आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी राज्यातील भाऊ, बाबा भक्त आणि विविध जाती, धर्म, पंथ आणि ओबीसींच्या बांधवांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून आशीर्वाद घ्यावा असे आवाहन वंजारी सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष मोहनराव आघाव यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले आहे. चौकट -------- भगवान भक्तीगड दसरा मेळाव्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात -------------------------- महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गड येथे होणाऱ्या १२ तारखेच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विविध प्रशासनाच्या माध्यमातून हालचाली वाढल्या असून विविध संत महानतांसह नेतेमंडळाची उपस्थिती राहणार आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्रातून भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ----------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या