Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त कलेक्टर सुनील चव्हाण यांची नाळ जमिनीला घट्ट .......... सय्यद अल्लाउद्दीन 

आष्टी(प्रतिनिधी) कलेक्टर या उच्च पदावर विराजमान झालेले आष्टीचे सुपुत्र सुनील चव्हाण आणि मी आष्टी येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत शिक्षण घेणारे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी होतो. डी.जी.देशपांडे दिग्दर्शित केलेल्या न.म.जोशी लिखित," जगणारी माणसं " या एकांकिकेत आम्ही सोबत भूमिका केल्या.त्याचे प्रयोगही झाले.जिल्हाधिकारी पदावर राहूनही त्यांची जन्मभूमीला नाळ घट्ट आहे.कुठलाही अहमगंड त्यांना शिवला नाही.माझा मुलगा डॉ.सय्यद हुमायुद्दीन छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात बीडीएस फेलोशिप करीत असताना त्याला जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून प्रोत्साहन दिले.अशा वर्गमित्राचा मला अभिमान वाटतो.या शब्दात कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी सुनील चव्हाण यांच्याबद्दल प्रशंसोउद्गार काढले.गौतम कोतवाल लिखित "जनमानसांतील जिल्हाधिकारी-एक कर्मयोगी " या पुस्तकाचे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रकाशन झाले.यावेळी मनोगत व्यक्त करताना कवी सय्यद आल्लाउद्दीन बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ना.अतुल सावे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,जिल्हाधिकारी कार्यालयातील,मंत्रालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी,लेखक गौतम कोतवाल,माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण, चव्हाण कुटुंब,नातेवाईक,मित्रपरिवार,डॉ.सय्यद हुमायूद्दीन अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या