Ticker

6/recent/ticker-posts

पाचवी ते बारावी पर्यंतचा अभ्यास मनापासून करा नक्कीच कलेक्टर व्हाल ............. डॉ.नरेशचंद्र काठोळे

आष्टी (प्रतिनिधी ) पदवीचे शिक्षण घेतानाच पाचवी ते बारावी पर्यंतचा अभ्यास मन लावून करा निश्चित कलेक्टर व्हाल असा विश्वास डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी व्यक्त केला. आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालय आजीवन शिक्षण व विस्तार केंद्र आणि महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान साहयता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा अंतर्गत आनंद ॲकेडमी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मिशन आय.ए. एस.महाराष्ट्रचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी डॉ. काठोळे बोलत होते.अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य व प्राचार्य डॉ.हरिदास विधाते होते.व्यासपीठावर प्राचार्य महादेव दानवे,उपप्राचार्य डॉ.संभू वाघुले,उपप्राचार्य डॉ.बापु खैरे,उपप्राचार्य डॉ.संजय धोंडे,प्रा.डॉ‌.शाम सांगळे उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी सांगितले की,मित्रांनो दररोज अभ्यास करा, वर्तमानपत्र वाचा त्यातून ताज्या घडामोडींची सर्व क्षेत्रातील माहिती मिळते.कलेक्टर होण्याचा ध्यास ठेऊन अभ्यास केल्यास कमीतकमी उपजिल्हाधिकारी,तहसीलदार होणारच. एखादी गोष्ट करायचे मनात आले तर लगेच करुन टाका.प्रत्येकाला चांगले बोलता आले पाहिजे‌.यश संपादन करण्यासाठी अभ्यासाचा सराव करा,वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवा . बारावीनंतर कलेक्टर होण्यासाठी दररोज दहा प्रश्न सोडवा व सकारात्मक रहा यश मिळणारच.मी रोज भावी पिढी सोबत बोलतो.विश्वास नांगरे पाटलांची प्रेरणा घ्या.स्पर्धा परिक्षासाठी काहीही अडचण आली तरी संपर्क करा. मुख्यसचिव कायम असतो तर मुख्यमंत्री टेंपररी असतात.‌कलेक्टर व्हायचे आहे तर मोठे स्वप्न पहा,आईवडील व गुरूंचा मान सन्मान करा.वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन व्यक्तीमत्व चांगले बनवा. मी जिवनात यशस्वी होणार हे ध्येय समोर ठेवून वाटचाल करा.दिवसभरात कोणता आणि किती अभ्यास करणार याचे नियोजन करा.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.शाम सांगळे यांनी केले.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.बापु खैरे,उपप्राचार्य डॉ.
संभू वाघुले, प्रा.डॉ.दत्ता नरसाळे यांची भाषणे झाली.सुत्रसंचलन प्रा.डॉ.शैलजा कुचेकर यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.दत्तात्रय बोडखे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या