
आष्टी (प्रतिनिधी)
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्या दुदैवी निधनानंतर लोकनेत्या आ.पंकजा मुंडे यांनी पुढे सुरू केली आहे.पुर्वी भगवानगडावर होणारा दसरा मेळावा गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव सावरगाव येथे पार पडत आहे.सावरगाव येथे राष्ट्रसंत भगवानबाबांचे भव्य स्मारक उभारून " भगवान भक्तीगड " असे नामकरण करून येथुन दसरा मेळाव्याच्या माध्यमातून लोकनेत्या पंकजा मुडे भगवान भक्तांना आणि गोपीनाथ मुंडे यांच्या चहात्यांना संबोधित करतात.सावरगाव येथे शनिवार दि.१२ आक्टोबर २०२४ रोजी होणाऱ्या भव्य दिव्य दसरा मेळाव्याची गावकऱ्यांकडून जय्यत तयारी झाली आहे.दसरा मेळाव्यात लोकनेत्या आ.पंकजा मुंडे आणि राज्याचे कृषीमंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे काय बोलणार ? याकडे जिल्हावासीवायांचे लक्ष लागले आहे.
शनिवारी भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा होत आहे.सावरगाव येथील नागरीक ‘आपला दसरा, आपली परंपरा’ व शक्ती आणि भक्तीची परंपरा जपण्यासाठी सज्ज झाले आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती.ती परंपरा पुढे लोकनेत्या आ. पंकजा मुंडे यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे.मागील काही वर्षांपासून राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव येथे हा दसरा मेळावा होत आहे.त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे भव्य दिव्य स्मारक उभारून परिसराला भगवान भक्तीगड असे नाव दिले आहे.हा मेळावा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम मानला जातो. मेळाव्याच्या व्यासपीठावर अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात.राष्ट्रसंत भगवानबाबा आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग दरवर्षी लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो.यावर्षी देखील लोकनेत्या पंकजा मुंडे या राष्ट्रसंत भगवानबाबांचे दर्शन घेऊन मेळाव्यास संबोधित करणार आहेत.याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
चौकट
-------------
भाजपचे वरिष्ठ नेते,आजी ,माजी आमदार,पदाधिकारी यांनी सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर येऊन व्यवस्थेची पाहाणी केली.व्यासपीठ आणि भक्तांना बसण्यासाठी असलेल्या मैदानासह राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या स्मारकाची पाहणी केली.यावर्षी गर्दीचा विचार करता डी झोन लोखंडी अॕगल, लोखंडी खांबाचे बनविले आहे. भव्य व्यासपीठ,रंगरंगोटी केली जात आहे.
भव्य दिव्य भगव्या
ध्वाजाचे ध्वजारोहन
--------------------------
सावरगांव येथील भगवान भक्तीगड येथे विजयादशमीनिमित्त लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यानिमित्त भव्य दिव्य भगवा ध्वजारोहन करण्यात आले आहे.
----------------------------------------
0 टिप्पण्या