Ticker

6/recent/ticker-posts

पारगाव जोगेश्वरी येथे आज नवरात्रनिमित्त वैष्णव मेळवा

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील पारगांव (जोगेश्वरी) येथे नवरात्रनिमित्त गुरुवार दि.३ ते ११ आक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न झाला. ह.भ.प. भानुदास महाराज शास्त्री, ह.भ.प. शिवाजी महाराज जगताप यांचे हस्ते घटस्थापना झाली.पुजा व घटस्थापनेस आ.बाळासाहेब आजबे,माजी मंत्री सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ. साहेबराव दरेकर,देवीदास धस,अमरराजे निंबाळकर,सतीषआबा शिंदे, बद्रीनाथ जगताप हे उपस्थित होते.नवरात्र महोत्सवात काकडा भजन,जोगेश्वरी मातेचा अभिषेक,रामविजय ग्रंथ वाचन,गाथाभजन, हरिपाठ,श्री ची आरती, किर्तन,हरिजागर आदि धार्मिक कार्यक्रम झाले.सायंकाळी ६ ते ७ आराधी भक्तांचा गायनाचा कार्यक्रम झाला.दररोज दुपारी ३ ते ५ यवेळात ह.भ.प.आश्रु महाराज मोकाशे यांच्या सुश्राव्य वाणीतुन रामकथा झाली.या सप्ताहात ह.भ.प.अमृताताई महाराज देवकाते,ह.भ.प.भगवान महाराज मचे (पाथर्डी),ह.भ.प.बंकट महाराज ढवळे (विनोदाचार्य), ह.भ.प.विकास महाराज देवडे (गायणाचार्य), ह.भ.प.महादेव महाराज राऊत (कुटअभंग विश्लेशक),ह.भ.प. अशोक महाराज इदगे (गायणाचार्य), ह.भ.प.पांडुरंग महाराज गिरी (विनोदाचार्य), ह.भ.प. आक्रुर महाराज साखरे (किर्तन केसरी), ह.भ.प.विनोदाचार्य दयानंद महाराज कोरेगांवकर यांचे हरिकीर्तन होणार आहेत.आज शनिवार दि.१२ आक्टोबर रोजी दसऱ्या दिवशी सकाळी ९ ते २० वैष्णव मेळावा होणार आहे.त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे.दि १६ आक्टोबर रोजी कोजागीरी पोर्णिमेनिमित ह.भ.प.अशोक महाराज भोसले (संस्थापक संत शिरोमणी नामदेव महाराज वारकरी संस्था, पारगाव (जो.) यांचे रात्री १० ते १२ किर्तन होऊन दूध प्रसादाने नवरात्र उत्सवाची सांगता होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या