, आष्टी (प्रतिनिधी)
सुनील चव्हाण तत्कालीन जिल्हाधिकारी,छत्रपती संभाजीनगर हे सचिव
मृद व जलसंधारण मंत्रालय मुंबई या पदावरून अलिकडेच सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांचे
जीवनावरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांचे हस्ते होणार आहे.लेखक
गौतम कोतवाल लिखित आष्टीचे सुपुत्र सुनील चव्हाण (भाप्रसे), माजी सचिव मृद व
जलसंधारण मंत्रालय यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी म्हणून केलेल्या
कार्याचा आढावा घेणाऱ्या " जन माणसांतील जिल्हाधिकारी एक कर्मयोगी " या पुस्तकाचा
उद्या गुरुवार दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी
कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात अल्पसंख्यांक विकास व औकाफ,पणन मंत्री
ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे. प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी
गृहनिर्माण व ईतर बहुजन कल्याण मंत्री ना.अतुल सावे राहणार आहेत.विशेष अतिथी म्हणून
सिडको मुंबईचे अध्यक्ष संजय शिरसाट,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
हे उपस्थित राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून खा.संदिपान भुमरे, खा. कल्याण
काळे,आ.विक्रम काळे,आ. प्रदीप जयस्वाल,आ.उदयसिंग राजपुत,आ.सतीष चव्हाण,आ.प्रशांत
बंब,आ.रमेश बोरनारे,सुनिल चव्हाण भाप्रसे (माजी सचिव मृद व जलसंधारण मंत्रालय)
दिलीप गावडे (भाप्रसे), विभागीय आयुक्त, दिलीप स्वामी भाप्रसे,
(जिल्हाधिकारी),श्री.जी.श्रीकांत भाप्रसे,(आयुक्त तथा प्रशासक मनपा), विनयकुमार
राठोड भापोसे,(पोलिस अधिक्षक), प्रवीण पवार भापोसे,(पोलिस आयुक्त), विकास मिना
भाप्रसे,(मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.) गौतम कोतवाल (लेखक) हे उपस्थित राहणार
आहेत. या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक ग्रीन वर्ल्ड प्रकाशन संस्थेने
केले आहे.
0 टिप्पण्या