
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील येथील श्रीराम मंदिरात शुक्रवार दि.४ ते दि.९
आक्टोंबर या कालावधीत कडा शहरातील श्रीराम वाचनलय आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे
आयोजन करण्यात आले आहे. याचा कडा शहरवासियांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी केले
आहे.आष्टी तालुक्यातील कडा येथील श्रीराम वाचनलय आयोजित विविध क्षेत्रातील अभ्यासू
व्यक्तीच्या व्याख्यानमालेचे आयोजन दि.४ रोजी शुक्रवारपासून सुरू होणार आहे.बुधवार
दि.९ रोजी सांगता होणार आहे.या व्याख्यानमालेत दि.४ आक्टोबर रोजी ह.भ.प.गोविंद
महाराज जाटदेवळेकर या चे “मतपत्रिका हीच शक्ती” या विषयावर ,तर शनिवार दि. ५ रोजी
विकास उमापुरकर बीड याचे “माध्यमाचा वापर व लोकजागरूता ” या विषयावर, तर रविवार
दि.६ रोजी डाॅ.अनिता उत्तम चव्हाण नाशिक याचे “दुर्गेचे आधुनिक रूपे” या विषयावर,
सोमवार दि.७ रोजी दामोदर प्रकाश रामदाशी पुणे याचे “समर्थ रामदास स्वामीची उपासना”
या विषयावर, मंगळवार दि.८ रोजी प्रा.डाॅ.अशोक कानडे पाथर्डी याचे “मंदिर
स्थापन्यकला व परंपरा” या विषयावर तर बुधवार दि.९ आक्टोबर रोजी डाॅ.विजयकुमार फड
निवृत्त आयएएस अधिकारी संभाजीनगर "ज्ञानेश्वरीतील आनंद लहरी” या विषयावर व्याख्यान
होणार आहेत.श्रीराम वाचनालयाने शारदीय नवरात्रामधे अखंडपणे गेले ५८ वर्ष ही
व्याख्यानमालेची परंपरा चालवली आहे या वर्षी ५९ वे. वर्ष आहे या व्याख्यान मालेचा
शहरातील नागरिकांनी श्रवणांचा लाभ घ्यावा असे वाचनालयाचे सचिव शंकर देशमुख,
कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील,अध्यक्ष अनिल ढोबळे,वाचनलायाचे सर्व सदस्य समन्वयक
दिपक किंबहुने,समन्वयक समीर पाटील, समन्वयक डाॅ.अशोक गांधी,संयोजन समिती अध्यक्ष
डाॅ. हरिदास विधाते यांनी केले आहे.
0 टिप्पण्या