Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी ग्रामीण रुग्णालयाला राज्य शासनाचा कायाकल्प पुरस्कार जाहीर

 









आष्टी (प्रतिनिधी)

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शासकीय रुग्णालयाच्या आरोग्य सुविधांचा दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने आरोग्य संस्थांना कायाकल्प या पुरस्काराने दरवर्षी गौरवण्यात येते.२०२३- २०२४ या वर्षातील कायाकल्प पुरस्काराची घोषणा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली.बीड जिल्ह्यातील सर्व संस्थानी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय आष्टीला पुरस्कार प्राप्त झाला केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सलग तिसऱ्या वर्षी पण प्रोत्साहन पत्र भेटून एक लाख रुपयाच्या उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ.अशोक बडे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि जिल्हा गुणवत्ता आश्वासक टीममधील सर्व सदस्य डॉ.दराडे मॅडम व बापू निकाळजे यांचे मार्गदर्शनामुळे शक्य झाले.वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे यांनी ग्रामीण रुग्णालयातील सर्व विभागाचे कामकाज सर्वांना सोबत घेऊन जनतेच्या सेवेसाठी अमुलाग्र बदल घडवून आणला.ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधिक्षक डॉ.राहुल टेकाडे,डाॕ.गुट्टे,डॉ.घोडके,डॉ.ढाकणे,डॉ. मस्तुद,डॉ.जावळे,डॉ.इमरान शेख,इन्चार्ज सिस्टर श्रीमती शेख बेबी,श्रीमती अर्चना घोडके अधिपारीचारिका सर्व स्टाफ सर्व विभाग प्रमुख इतर सर्व स्वच्छतेचे पुढाकार करून स्वच्छता राबवणारे शिपाई सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या