मुंबई - विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार ? आणि आचारसंहिता केव्हा लागणार ?
याची काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांसह सर्वांना उत्सुकता होती. अखेर निवडणूक
आयोग राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला
मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहिर होणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मंगळवार दि.१५
आक्टोबर रोजी दुपारी ३.३० वा.आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद ते बोलत
होते.पुढे बोलतांना निवडणूक आयोग हे म्हणाले,महाराष्ट्रातील २८८ विधानसभेत एकूण १
लाख १८६ मतदान केंद्र आहेत.९ कोटी ६३ लाख मतदार असल्याचे निवडणक आयोगाने सांगितले.
0 टिप्पण्या