आष्टी ( प्रतिनिधी)

जनविकास महाविद्यालयात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा कण्यात आला.हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. प्रारंभी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.हरिदास पिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल मोरे जयंत यांनी केले प्रस्ताविकामध्ये प्रा. मोरे जयंत यांनी आपले विचार मांडताना आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की, डॉ.कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. जसे त्यांच्यामध्ये असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास,कणखर मन आणि दिलदार स्वभाव. यामुळेच डॉ.कलाम यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून पुढे येणार आहे.भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे, हे त्यांनी सांगितले आहे.डॉ.कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे.त्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,यादृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन केले जात आहे. या वाचन प्रेरणा दिनामध्ये अधिकाधिक कार्यालये, बँका, कार्पोरेट कार्यालये यांनीही सहभाग घ्यावा आणि वाचन संस्कृतीला बळकट करावे असे आवाहन ग्रंथपाल प्रा.जयंत मोरे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. संगीता मोरे यांनी केले तर आभार प्रा. डॉ.केशव तिडके यांनी मानले.
0 टिप्पण्या