Ticker

6/recent/ticker-posts

नियमित वाचनाने विद्यार्थी समृद्ध होतो ........... प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ

आष्टी (प्रतिनिधी) भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आष्टी येथील भगवान महाविद्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' ग्रंथालय विभागतर्फे साजरा करण्यात आला.याप्रसंगी आष्टी येथील ॲड. कांतिलाल आस्वर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आजचे युवक जर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विचारसरणीचे अनुसरण करून पुढे गेले तर लवकरच आपला देश जागतिक महासत्ता बनेल.याप्रसंगी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.दत्तात्र्यय वाघ म्हणाले, 'विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात येऊन वाचन केले पाहिजे,मोबाईलच्या नादी लागण्यापेक्षा पुस्तके वाचून आपल्या जीवनाला योग्य दिशा द्यावी'. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.वैद्य डी.बी.आणि डॉ.आप्पासाहेब टाळके हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रंथपाल नंदकिशोर धोंडे यानी केले तर आभार डॉ.बाळासाहेब गावडे यानी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या