उत्सव वार्ता -------- उत्तम ,बोडखे,आष्टी
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुकामाता. माहूर हे प्राचीन किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता,दत्तात्रेय,अनसूयामाता या तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा हा माहूरचा डोंगरकिल्ला.तिचेच उपपीठ म्हणून आष्टी तालुक्यातील बेलगावच्या रेणुकाईदेवीचे ओळख आहे.दरवर्षी पायी माहूरला जाणाऱ्या आपल्या भक्ताच्या पाठीमागे शेळीच्या रुपात माहूरची रेणुकामाता येऊन बेलगांव या गावी प्रकट झाली अशी जुनी आख्यायिका आहे. बेलगाव व परिसरातील भाविकांची ही कुलदेवता आहे. बेलगांव गावचे ग्रामस्थ मोठ्या श्रद्धाभावाने रेणुकाई मातेची मनोभावे सेवा करतात.रेणुकाई देवीला यात्रा व नवरात्रोत्सवाला विशेष साज,श्रृंगार चढवला जातो.सोन्याचे दागिणे आणि अलंकार देवीला चढविले जातात. दागिण्यांनी सजलेल्या रेणुका देवीचं नयन मनोहरी रुप प्रत्यक्ष डोळ्याने पाहण्यासारखे असते.आष्टी शहरापासून १० कि.मी.अंतरावर बेलगाव हे गाव वसलेले आहे.त्या गावचे जागृत देवस्थान माहूरगडचे उपस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेणुकाईमातेचे पुरातन काळातील दगडी कोरीव केलेले मंदिर आहे. हे मंदिर बोकडी नदीच्या काठावर टेकडीवर आहे.नयनरम्य वातावरणात देवीचे मंदिर आहे.हा परिसर भाविक व पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. बेलगाव आणि परिसरात रेणुकामाता देवीचे महात्म आहे. संपूर्ण पंचक्रोशीत ही देवी नवसाला पावते म्हणून तिची ख्याती आहे. मोठ्या भक्तिभावाने बेलगांव ग्रामस्थ नवरात्र उत्सवात विधिवत पुजाअर्चा करून घटस्थापना करून नऊ दिवस देवीचा जागर करतात. निसर्गरम्य वातावरणात असलेले देवीचे मंदिर हे राज्यातील कानाकोपऱ्यातुन व आष्टी तालुक्यातील भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. रेणुकामातेचे महात्म्य पूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.दरवर्षी बेलगाव येथील तरुण श्री क्षेत्र माहूरगड ते बेलगाव ५०० कि.मी.चे अंतर पायी चालत देवीची ज्योत घेऊन येतात. ही ज्योत माहूरगड ते बेलगाव पायी चालत घेऊन यायचे हे १६ वे. वर्ष आहे. ही परंपरा कायम आहे. यामध्ये जवळपास २०० च्यावरती तरुण सहभागी होतात.बेलगाव ग्रामस्थ नवरात्रात नऊ दिवस मोठ्या श्रद्धेभावाने नवरात्र महोत्सव साजरा करतात.९ दिवस विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम घेऊन नवरात्रीत नवदुर्गाचा जागर घालून शारदीय नवरात्र महोत्सव दिवसभर विविध कार्यक्रम व रात्री हरीकिर्तन असे दैनंदिन कार्यक्रम असतात. शेवटच्या दिवशी नवरात्रोत्सवाची काल्याचे कीर्तनाने व महाप्रसादाने सांगता होते.मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तजयंतीच्या दिवशी रेणुकाई मातेची यात्रा बेलगांव ग्रामस्थ मोठया उत्साहात साजरी करतात.तीन दिवस हा यात्रा महोत्सव चालतो. पहिल्या दिवशी विधीवत पौर्णिमेदिवशी देवीची पालखी छबिना मिरवणूक,दुसऱ्या दिवशी भव्य मल्लाचा हंगाम भरला जातो.हा हंगामा आणि यात्रा बेलगाव परिसरातील अठेगाव पुठ्यात प्रसिध्द आहे.तिसऱ्या दिवशी हीच यात्रा गावात भरते. यात्रेच्या दरम्यान देवीचा परिसर भाविक भक्तांच्या गर्दीने गजबजून केलेला असतो.नुकताच श्री रेणुकाई देवी देवस्थान ट्रस्टला मंदिर विकास कामांसाठी ५ कोटी रु चा निधी मिळला आहे.या विकास कामांचे भुमीपुजन नुकतेच माजी मंत्री सुरेश धस यांच्या हस्ते झाले. बेलगांव येथे १२ कोटी ३९ लक्ष रु.च्या विविध विकास कामांचे भुमिपजन व लोकार्पण ------------------------------ बेलगाव देवस्थानला माजी मंत्री सुरेश धस यांच्या पाठपुराव्याने नुकताच " ब " दर्जा मिळाला आहे. बेलगाव येथील रेणुकामाता देवस्थान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ( ब वर्ग) अंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांस “ ब ” वर्ग दर्जा मिळला. बेलगाव या देवस्थानचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र व वर्गमध्ये समावेश करण्यात आला.बेलगांव येथे १२ कोटी ३९ लक्ष रु.च्या विविध विकास कामांचे भुमिपजन व लोकार्पण सोहळा झाला आहे. श्री क्षेत्र रेणुकामाता देवस्थान बेलगावसाठी ४ कोटी ९० लक्ष रु, राज्य मार्ग ७० ते बेलगाव मांडवा रस्ता यासाठी ३ कोटी रु,जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा सोय करणे ६६ लक्ष रु, एमआरईजीएस अंर्तगत जि.प. प्राथमिक शाळा कंपाऊंड वॉल बांधकाम करणे १ कोटी रु, ग्रामपंचायत भवन बांधकाम करणे ३५ लक्ष रु ,श्रीविठ्ठल रुख्मिणी मंदिर, लक्ष्मी माता मंदिर व रेणुका माता मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसवणे ३० लक्ष रु,स्मशानभूमी अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हिंग ब्लॉक ३० लक्ष रु ,एमआरईजीएस अंर्तगत रस्ता मजबुतीकरण करणे १.५ कोटी रु ,रेणुकामाता मंदिर परिसर सुशोभीकरण १० लक्ष रु,शिंदे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नळकांडी पुल बांधकाम करणे १० लक्ष रु, दलितवस्तीमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे १० लक्ष रु,अहिल्यादेवी होळकर योजने अंतर्गत धनगर समाजासाठी ४० घरकुल मंजुरी,रमाबाई घरकुल योजने अंतर्गत २६ घरकुल मंजुरी मिळाली असल्याची माहिती सरपंच, उपसरपंच यांनी दिली. -------------------------------