
आष्टी (प्रतीनिधी )
महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या आदेशानुसार राज्यभरात महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली करण्यासाठी २ ऑक्टोबर २०२४ हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करताना आष्टी आगारात म. गांधी जयंती साजरी करत आगारात आगार प्रमुख पी.बी.चौथमल यांनी स्वच्छता मोहीम राबवत आगार परिसर स्वच्छ केला.भारतासाठी स्वयंसेविता आणि सामूहिक कृतीला बळ देण्यासाठी १७ सप्टेंबर पासून स्वच्छता हीच सेवा पंधरवडा साजरा केला जात असताना आष्टी आगाराने स्वभाव स्वच्छता , संस्कार स्वच्छता हे घोषवाक्य घेऊन आगारातील बसेस, बसस्थानक, बस स्थानक परिसर व प्रसाधन गृहाची सखोल स्वच्छता सखोल स्वच्छता करण्यात आली.बसस्थानक परिसरातील दगड, मातीचे डिगारे, अनावश्यक झाडे, दीर्घकाळ साचलेला कचरा स्वच्छ करत स्थानकातील छत पंखे, उंच भिंती यावर साठलेल्या जाळी जळमटे काढून घेण्यात आल्या या स्वच्छता मोहिमेत आगार प्रमुखासह वाहतूक निरीक्षक आर.ए.जाधव, सहाय्यक वाहतूक निरीक्षक बी.बी. गायकवाड,ए.डब्ल्यू एस एम के तांबोळी, आदि प्रमुख अधिकाऱ्यांसह वरिष्ठ लिपिक महेश कर्डिले,पाळी प्रमुख . गव्हाणे, के ए.ल धोत्रे, एटीआय देशमुख, संजय निंबाळकर,मुळे मॅडम, इंधन लिपिक शिरसाट,लांडगे आधी कर्मचाऱ्यांसोबत चालक ज्ञानोबा ढाकणे, हनुमंत सोनटक्के, गोरा शिंदे, वाहक विनायक धस, एच.एस.नांगरे अदिसह आगारातील उपस्थित कर्मचारी व कामगारांनी सहभाग नोंदवत स्वच्छता मोहीम यशस्वी केली .
0 टिप्पण्या