Ticker

6/recent/ticker-posts

बिभवी प्राथ.शाळेतील राज गुळंबे, आर्या परिहार यांचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सुयश

आष्टी (प्रतिनिधी) सातारा जिल्हा परिषदेची बिभवी येथील जि.प.प्राथमिक शाळेने शासकीय जावळी तालुकास्तीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलेले आहे. सातारा येथील छत्रपती शाहु महाराज क्रीडा संकुलात शासकीय जावळी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत बिभवी जि.प.प्राथ.शाळेतील दोन खेळाडु विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलेले आहे.त्यामध्ये १४ वर्षे वयोगट मुले राज मोहन गुळंबे (उंच उडी तालुकास्तर प्रथम क्रमांक) आणि जिल्हास्तरीय निवड,१४ वर्षे वयोगट मुले राज मोहन गुळंबे (हर्डल्स प्रथम क्रमांक) आणि जिल्हास्तरीय निवड,१४ वर्षे वयोगट मुली कु.आर्या सागर परिहार (लांब उडी तालुकास्तर द्वितीय क्रमांक) आणि जिल्हास्तरीय निवड, १४ वर्षे वयोगट मुली कु. आर्या सागर परिहार (हर्डल्स द्वितीय क्रमांक) आणि जिल्हास्तरीय निवड झाली आहे. या दोनही खेळाडु विद्यार्थ्यांचे भणंग केंद्राचे केंद्रप्रमुख,बिभवी शाळेतचे मुख्याध्यापक लकडे,शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ बिभवी यांनी अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या