आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी विधानसभा मतदार संघातील सावरगांव मच्छिंद्रनाथगड,आष्टी
पिंपळेश्वर मंदिर,नागतळा नागनाथ देवस्थान,पिंपळवंडी आश्वलिंग देवस्थान,वाळूंज
भैरवनाथ देवस्थान,आष्टी (मुर्शदपुरचे) माऊली मंदिर या सर्व देवस्थानसाठी आपण
मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे.त्याप्रमाणेच बेलगांव येथील रेणूकामातेच्या
विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे आणि भविष्यात हे मोठे तिर्थस्थळ
करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु अशी ग्वाही माजी मंत्री सुरेश धस यांनी दिली.आष्टी
तालुक्यातील बेलगांव येथे १२ कोटी रु विकास कामांचा शुभारंभ सोमवार दि.७ आक्टोबर
रोजी सकाळी १० वा.माजी मंत्री सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत
होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपचे तालुकाध्यक्ष अॕड.साहेबराव म्हस्के,रावसाहेब
पोकळे,नगराध्यक्ष जिया बेग,कल्याण पोकळे, सरपंच तात्या शिंदे,उपसरपंच सतीष
पोकळे,इंजि.प्रविण वारे,किरण पोकळे, खंडुदादा जाधव,


आत्माराम फुंदे आदि मान्यवर
उपस्थित होते.पुढे बोलतांना धस म्हणाले की, रेणुकामाता मंदिरास ४ कोटी,बेलगांव ते
मांडवारस्ता ३ कोटी व जलजीवन काम असे एकूण १२ कोटी रूपायांची कामे येथे मंजूर केले
आहेत.जलजीवन योजना ही देशाचे पंतप्रधान यांनी लक्ष घालून देशातील प्रत्येक गावात "
जल और नल " ची योजना प्रभावीपणे राबवली आहे.सार्वजनिक कामे कसे करायची याचे उत्तम
उदाहरण पाहायचे असेल तर आपल्या मतदार संघातील कुसूळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्र
पाहा मग कळेल की,काम कसे असावे. बेलगांवचे इंजि.प्रविण वारे म्हणाले की, आतापर्यंत
बेलगांवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी कोणीच दिला नाही मात्र धसआण्णांनी
बेलगांवाला एकाच वेळी १२ कोटी निधी देणारा एकमेव नेता ठरला आहे. त्यांच्या
मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विकास कामे करून गावचा कायापालट करणार असल्याचे
वारे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमृत पोकळे यांनी केले तर आभार
शिंदेमामा यांनी मानले.
0 टिप्पण्या