Ticker

6/recent/ticker-posts

संवेदनशील मन आणि प्रामाणिकपणाने आरोग्य सेवा करणारे ................ प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ- डॉ.योगेश फुंदे आणि डॉ.सरोजीनी फुंदे









आष्टी  (प्रतिनिधी) त्यंत संवेदनशील,प्रमाणिकपणा,प्रचंड कष्ट,ध्येय,जिद्द आणि जाणीव ठेवून गोरगरीब दिनदुबळ्या अनाथ,अपंग शेतकरी शेतमजूर वंचित घटकासह सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रियांच्या विविध आरोग्य समस्यावर मनापासून स्त्री रोगमुक्तीचा ध्यास घेत गेल्या दोन दशकापासून शेवगावकरांना प्रमाणिक सेवा देणारे डॉ.योगेश भीमराव फुंदे हे स्नेह आणि आपुलकीचे तज्ञ डॉक्टर म्हणून नावारूपाला आलेले आहेत.शांत स्वभाव धीर गंभीर आणि संवेदनशील मन अर्थात सर्वसामान्य परिस्थितीतून एमबीबीएस एमडी पदवी घेतल्यानंतर त्यांनी मोठ्या शहरात स्थिरस्थावर होण्याऐवजी शेवगावसारख्या सर्वसामान्य तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांच्या विविध समस्यांना न्याय देण्याचा प्रमाणिक प्रयत्न अत्यंत आवाहन स्वीकारून केला.पत्नी डॉ.सरोजिनी फुंदे यांच्या प्रगल्भ सहकार्याने त्यांनी आजपर्यंत अनेक स्त्रियांच्या दीर्घ समस्या तसेच मूल होण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रयत्नपूर्वक उपचार करत न्याय देण्याचा प्रमाणिक प्रयत्न यशस्वीपणे केलेला आहे. त्याचे अनेक उदाहरणे या परिसरात असून गोरगरीब कुटुंबातील पेशंटस त्यांना धन्यवाद देताना दिसून येत आहेत.पत्नी डॉ.सरोजिनी ह्या डेंटल विभाग तितक्याच दमदारपणे सांभाळतात. मिरीरोड रस्त्यावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये स्वच्छता टापटिपपणा शिस्त आणि संस्कार या मूल्यावर आधारित एक विश्वासाचे नाते सांभाळण्याचे काम त्यांनी गेल्या अनेक सालापासून केले आहेत.डॉ.योगेश फुंदे सरांच्या स्नेहपूर्ण आणि आदराने तसेच विश्वास पूर्ण उपचारामुळे हजारो रुग्णांचे ते आपुलकीचे नाते करणारी डॉक्टर ठरले आहेत.डॉ.योगेश फुंदे यांच्याशी संवाद साधताना त्यांनी या आरोग्य सेवेमध्ये प्रमाणिकपणे केलेल्या कार्यामुळे आणि अभ्यासामुळे अनेक महिला रुग्णांच्या जीवनात नवा प्रकाश आल्याचे उदाहरणे पाहायला मिळाले. डॉ.योगेश भीमराव फुंदे यांच्या प्रमाणित कर्तव्य भावनेला शेवगाव तालुक्यासह परिसरामध्ये मनापासून धन्यवाद दिले जात आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या