Ticker

6/recent/ticker-posts

कापुस,सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य मिळणार ; शेतकऱ्यांनी केवायसी करावे .............. तालुका कृषी अधिकारी तरटे

 








सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक

शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १००० रु तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती

हेक्टर रु.५.००० (२ हेक्टरच्या मर्यादित) अर्थ सहाय्य द्यावयाचे

आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२

उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे. वनपट्टाधारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख

संघनकीकरण झाले नाही अशा गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यातच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. तरी गावांमध्ये यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून ई-केवायसी

करून घ्यावी काही समस्या आल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केले आहे.शेतक-यांना ई- केवासी करण्यासाठी

scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर खालीलप्रमाणे

सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.ज्या शेतक-यांचे ई-केवासी करावयाचे आहे, त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदरच्या शेतक-यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा.कृषि सहाय्यक त्यांचे login मध्ये उपलब्ध सुविधेव्दारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकवर येणाऱ्या OTP च्या माध्यमातून e-kya करतील.शेतकरी स्वतः सुद्धा यापोर्टलवर जाऊन OTP च्या माध्यमातून किंवा Biometric च्या माध्यमातून सेवा

सुविधा केंद्रात (CSC) जावूनसुद्धा  करु शकतात.याकरिता पोर्टलच्या मुख्य

पानावर Disbursement status'oWo click केल्यानंतर शेतक-यांनी

आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर

मोबाईलवर प्राप्त OTP किंवा csa केंद्रातील Biometric मशिनच्या

माध्यमातून ते e-kyc पूर्ण करु शकतात. शेतकऱ्यांनी तात्काळ e-kyc करुन घ्यावे, अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या