आष्टी (प्रतिनिधी)
बनसारोळा येथील जनविकास महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने १९६९ मध्ये सुरू केलेली राष्ट्रीय सेवा योजना आहे .राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे, महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे प्रौढ शिक्षण , गलिच्छ वस्त्यांची सफाई ,प्रथमोपचार , नागरी संरक्षण इत्यादी कार्यक्रमाचा राष्ट्रीय सेवा योजनेत समावेश आहे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्राउंड मध्ये स्वच्छता ,इनडोअर समोरील स्वच्छता, लेडीजरूम समोरील स्वच्छता,लेडीज होस्टेल समोरील स्वच्छता करण्यात आली तसेच प्लास्टिक मुक्त महाविद्यालय परिसर करण्यात आला.या स्वच्छता अभियानात प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे ,विद्यार्थी, विद्यार्थिनी ,प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. गीतांजली मोटे यांनी पुढाकार घेतला.

0 टिप्पण्या