Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीच्या राजेश्वरीच्या इंस्टाग्रामवरील " रिल्स "ला प्रेक्षकांची भरभरून पसंती...

    








               साहित्य, कला, संगीत,आणि अभिनय ही गुणवत्ता ही केवळ शहरी भागामध्ये नसून ग्रामीण भागामध्येदेखील असे गुणवत्ताधारक असून त्यांना या अंगभूत कलागुणांना वाव मिळाल्यास त्यांना देखील प्रसिद्धी मिळत असते. अशाच एका हरहुन्नरी कलाकाराच्या   " इंस्टाग्राम वरील " रिल्स  पाहून महाराष्ट्रातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.आष्टी येथील ग्रामविकास अधिकारी असलेले प्रल्हाद शाहीर आणि  सौ.संगीता शाहीर यांची कन्या राजेश्वरी शाहीर ही तिच्या..

 " राजेश्वरी--१६ " इंस्टाग्रामवरील अकाउंटवरून संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत आहे..या रिल्स पाहून महाराष्ट्र राज्यातील तरुणाईने तिला भरभरून प्रतिसाद दिला आहे.मूळची आष्टी येथील रहिवासी असलेली राजेश्वरी प्रल्हाद शाहीर हिचे प्राथमिक शिक्षण आष्टीतील जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेमध्ये झाले आणि संगणक शास्त्रातील पदवीधर (बीसीएस) ही पदवी आष्टी येथील नालंदा  महाविद्यालया मध्ये पूर्ण करून राजेश्वरी ही सध्या पुणे येथे एमआयटी या मान्यवर शिक्षण संस्थेमध्ये मानवी संसाधन विषयांमध्ये एमबीएच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे.

प्रल्हाद शाहीर यांच्या पत्नी सौ.संगीता शाहीर या कुशल कलावंत असून त्यांनी " टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ " आणि आकर्षक वस्तू तयार करण्याची त्यांना कला अवगत आहे. लहान मुलांची खेळणी तयार करणे या कलेमध्ये त्या पारंगत आहेत. त्यांच्या कलेचा वारसा त्यांची मुलगी राजेश्वरी  चालवण्याची तयारी करत आहे.राजेश्वरीने मध्यंतरी पुणे येथेच प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तिने आता आपला प्रवास अभिनयाकडे सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. इंस्टाग्राम वर . " राजेश्वरी --१६ " या नावाने तिचे रिल्स दिवसेंदिवस चर्चेचा आणि कौतुकाचा विषय झाला आहे ही तिची कला पाहून तिचे फॉलोवर्स देखील मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. राजेश्वरी अत्यंत अभ्यासू आणि सूक्ष्म निरीक्षण असणारी कलावंत असून अभ्यासाबरोबरच तिने तिच्यातील कलावंत जोपासला आहे.आष्टी येथील कन्या प्रशालेत असताना शालेय जीवनामध्ये आणि पुणे येथील एमआयटी सारख्या नामांकित शिक्षण संस्थेमध्ये देखील तिने सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपणास सहभाग नोंदवून तेथील प्रेक्षकांमध्ये आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे.ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेऊन देखील राजेश्वरी पुणे शहरासारख्या प्रगत वातावरणामध्ये समरस झाली आहे. तिने  यापुढील वाटचाल अभिनयाकडे करण्यासाठी तिची पूर्ण तयारी झाली आहे. राजेश्वरीने सांस्कृतिक विभागामध्ये आणि अभिनयामध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी सतत आई-वडील आणि मोठी बहीण तिला सतत प्रोत्साहित करत असतात. राजेश्वरीची आजवरची वाटचाल पाहता आणि इंस्टाग्रामवरील कला पाहता  या अभिनय क्षेत्रामध्ये यशस्वी होईल यात शंका नाही म्हणून असे म्हणावे  वाटते की,    

   समय कभी नही रुकता है..           

   चलता है..                 

  बस चलता है..

 सफल वही यह रहता है, 

समय के साथ जो चलता है..        


झुंजारवार्ता न्युज पोर्टलच्यावतीने  राजेश्वरीला पुढील वाटचालीस शुभेच्छा ......

  -----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या