आष्टी (प्रतिनिधी)
दिड महिन्यानंतर शुक्रवार दि.६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता
नागपूर येथील वैशाली नेमगोंडा पाटील यांनी आष्टी तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला
आहे.आष्टी येथील तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी
नियुक्ती मिळालेल्या तहसीलदार वैशाली नेमगोंडा गेल्या दिड महिन्यांपासून रुजू न
झाल्याने आष्टी तहसीलदारांचे पद रिक्त होते.यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
जनतेची मोठी गैरसोय होत होती. शुक्रवार दि.६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा.नागपूर
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या वैशाली नेमगोंडा पाटील यांनी आष्टी
तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे.आष्टी तहसिल कार्यालयातील अव्वल कारकुन भगीरथ
धारक,अव्वल कारकुन राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर सोनटक्के यांच्यासह अधिकारी, कर्मचारी
यांनी नवीन तहसिदार नेमगोंडा यांचे स्वागत केले.येणा-या काळात त्यांच्यासमोर
विधानसभा निवडणुक, अवैध वाळू वाहतूक,गौण खनिज यासह आदि आव्हाने आहेत.
0 टिप्पण्या