Ticker

6/recent/ticker-posts

कडा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे आदर्श शिक्षक व उपक्रमशील शाळा पुरस्कार जाहिर ................ चेअरमन मारुती पठाडे

आष्टी (प्रतिनिधी ) आष्टी तालुक्यातील शिक्षकांची कामधेनु आणि प्रगतशील व नावलौकिक असलेली कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्थेचे सन २०२४- २०२५ चे आदर्श शिक्षक व उपक्रमशील शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत अशी माहिती चेअरमन मारुती पठाडे,व्हाईस चेअरमन अशोक लटपटे, सचिव महेशकुमार शिंदे व संचालक मंडळाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे शैक्षणिक,सामाजिक, क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या शिक्षकांना स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेतर्फे " आदर्श शिक्षक " निवड करून त्यांचा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सत्कार करण्यात येत असतो.शाळेमध्ये विविध उपक्रम राबवणाऱ्या उपक्रमशील शाळांची निवड प्रतिवर्षी करण्यात येते.त्या शाळेंचाही सत्कार समारंभ संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात येत असतो. त्यानुसार सन २०२४- २०२५ साठीचे आदर्श शिक्षक पुरस्कार व उपक्रमशील शाळांची नावे पुढीलप्रमाणे.... मच्छिंद्र जगताप ( हरिनारायण आष्टा), एकनाथ खांडवी (सुलेमान देवळा), बाबासाहेब लोंढे (हिंगणी),महेश पर्वतकर (कुंभेफळ),अनंता शिरसवाल (भाळवणी), नंदकुमार अस्वर (सराटेवडगांव),शिवाजी गोंदकर (शेरी खुर्द), नामदेव बोडखे ( खिळद),राजु मोरे (साबलखेड), उत्तम माळी (बांदखेल),श्रीमती उर्मिला वराट (चिंचपूर), दत्तात्रय गुरसाळे (महाजनवाडी),संजु वाडगे (जाटनांदुर), रावसाहेब घुले (कारखेल),बाळासाहेब पुंडे (वेलतुरी),रामदास दहिफळे (वनवेवाडी), प्रकाश पिंपरे (शेरीफाटा शिराळ),श्रीमती सुलताना शेख नय्यर ( आष्टी नं.२),संपत आमटे (रुईनालकोल टाकळी अमिया),श्रीमती मनिषा शेवंते (कडा), महेश वाटाडे (कोल्हेवाडी)' अशोक गांगर्डे (पोकळेवस्ती लोणी), सय्यद आरिफ (गुंडेवाडी),रामदास सोले (आंधळेवाडी),श्रीमती संजीवनी कोकणे ( पुंडी) यांचा समावेश आहे. विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार अशोक झगडे ( प्रा.शा. झोपडपट्टी चोभानिमगाव), उपक्रमशिल शाळा.इयत्ता पहिली ते पाचवी - जि.प.प्राथमिक शाळा वाळकेवस्ती लोणी), जि.प.प्राथमिक शाळा दैठणा (केंद्र पारगाव जोगेश्वरी),इयत्ता पहिली ते सातवी - जि.प. प्राथमिक शाळा महिंदा (केंद्र पाटसरा) यांची निवड करण्यात आलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या