Ticker

6/recent/ticker-posts

माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संस्थेस नवीन नर्सिंग कॉलेजला मान्यता

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित या शैक्षणिक संस्थेस नवीन नर्सिंग कॉलेजला शासनाची मान्यता मिळाली आहे.आष्टी,पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी मतदार संघात सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय केली आहे.प्रत्येक वर्षी नवनवीन शिक्षणाची सोय करण्यात येत आहे.या नविन महाविद्यालयामुळे आष्टीच्या वैभवात भर पडली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य सेवेत काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यापुढे आता दुसऱ्या शहरात जाण्याची आवश्यकता लागणार नाही.आष्टी येथील आनंद शैक्षणिक संकुलात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृषी, अन्नतंत्र,फार्मसी, पॅरामेडीकल, कृषीतंत्र, इंजिनिअरिंग वैद्यकीय शिक्षणाबरोबर आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नर्सिंगच्या शिक्षणाची सोय झाली आहे.शेतकरी शिक्षण संस्थेस नर्सिंग कॉलेजला महाराष्ट्र शासन यांची मान्यता व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ यांचे संलग्निकरण मिळाले आहे.आष्टी येथील आनंद शैक्षणिक संकुलात नर्सिंग काॅलेजला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बीड व अहमदनगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील विद्यार्थांचे नर्सिंग होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.सन २०२४ -२०२५ साठी प्रवेश सुरू झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग कॉलेजला प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.विद्यार्थी व पालक यांच्याकडून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे व संस्थेचे सहसचिव डॉ अजयदादा धोंडे यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या