Ticker

6/recent/ticker-posts

नविन शैक्षणिक धोरणामुळे सक्षम विद्यार्थी घडतील ....... प्रोफेसर शाम सिरसाठ

आष्टी (प्रतिनिधी) पारंपरिक शिक्षणाला फाटा देत कौशल्ये पूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे मिळणार आहे. विद्यार्थी स्वतःचे
व्यक्तीत्व तयार करून स्वयंरोजगार निर्मिती करणार आहे.आजच्या विद्यार्थ्यां कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे त्या प्रकारच्या अभ्यासक्रम तयार केली जात आहे. व्याख्यान पध्दतीने शिक्षण देणे या पध्दतीच्या शिक्षणाबरोबर प्रात्यक्षिक जोड मिळणार आहे. विषयाचा गाभा व आवाका लक्षात प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळणार असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे मा.प्र.कुलगुरू प्रोफेसर शाम सिरसाठ यांनी केले. कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयामध्ये भाषा व समाजशास्त्रे विभाग व झेप फाऊंडेशन मुंबई यांचेवतीने राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बीजभाषण देतांना प्रोफेसर शाम सिरसाठ बोलत होते. अध्यक्षस्थानी युवा नेते अभयराजे धोंडे होते.याप्रसंगी उद्घाटक म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर प्रोफेसर व्यंकटेश लांब उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रोफेसर कालिदास भांगे, प्रोफेसर डी.एस.गजहंस,डॉ.अभय शिंदे, तसेच डॉ.सुर्यकांत धोंडे,डाॕ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर सिनेट सदस्य प्राचार्य डाॕ. हरिदास विधाते हे व्यासपीठावर उपस्थित होते.याप्रसंगी राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन म्हणून मनोगत व्यक्त करताना डॉ.व्यकटेश लांब म्हणाले की,आज नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये कौशल्ये पूर्ण शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.देशाची प्रगती औद्योगीकरणामुळे मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे कौशल्ये शिक्षण गतिमान झालेले आहे.आयआयटी सारख्या संस्था तरुणांना पाहिजे ते टेक्निकल शिक्षण देत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे विद्यार्थ्यांना चौफेर ज्ञान प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचणे अत्यंत महत्त्वाची वाटते ,दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यास मिळाले पाहिजे म्हणून संशोधक व प्राध्यापकांनी ज्ञान अध्यावत ठेवून विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण द्यावे. याप्रसंगी प्राचार्य डॉ विधाते यांनी प्रस्ताविक भाषणात राष्ट्रीय परिषद घेण्यामागील भूमिका विशद केली.घेतलेल्या तरुणांची मागणी करत आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शैलेजा कुचेकर यांनी तर आभार प्राेफेसर एम.आर.पटेल यांनी व्यक्त केले. परिषदेसाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या