

विशेष लेख
----------
उत्तम बोडखे
व्यावसायिक अभिनेत्री बनण्यासाठी लहान मुलींपासून अगदी वयस्कर व्यक्तिपर्यन्त
प्रत्येक व्यक्ति केवळ उत्सुकच नाही तर उतावीळ झालेली असते. खरं तर या
क्षेत्रातल्या ग्लॅमरचे आकर्षण असतं सर्वाना.अभिनय क्षेत्रात मिळणारा नाव लौकिक आणि
पैसा यामुळे प्रत्येकजण या क्षेत्राकडे आकर्षित होत असतो. या क्षेत्रातल्या
ग्लॅमरपेक्षा अभिनयाचे ग्रामर किती महत्वाचे आहे. याचा विचारच अनेकजण करत
नाहीत.अभिनय कलेला स्वतःची थिअरी आहे.प्रॅक्टिकल्स आहेत.गणिताप्रमाणे सूत्र आहेत
आणि म्हणूनच ही कलाही आहे आणि शास्त्रही आहे.अभिनय हा कलेच्या माध्यमातून परंतू
तरीही शास्त्राच्या चौकटीत सादर करायचा असतो.अभिनय ही कला असूनही शास्त्रोक्त
पद्धतीने ती साकारावी लागते.योग्य आहार, योग्य आचार,तंदुरुस्त शरीर,प्रसन्न हास्य,
सहकार्याची भावना, एकरूप होऊन निष्ठेने काम करून जीवंत आणि विश्वासार्ह अभिनयाचा
आविष्कार प्रकट करणे हीच यशस्वी अभिनेत्रीची लक्षणं म्हंटली जातात.अभिनय करणारा
कलावंत दुसऱ्या एखाद्या पात्राचे अस्तित्व उभे करताना त्याचे सहीसही अनुकरण करतो.हे
अनुकरण तंतोतंत जुळले तर प्रेक्षकांना कलावंताच्या अस्तित्वाचा विसर पडून ती दुसरी
व्यक्ति समोर असल्याचा भास होतो आणि हाच आपला जीवंत अभिनय असतो. वागणूक,हालचाली,
आवाज,दृष्टिक्षेप या सर्वाच्या संयमी आणि सखोल अभ्यासातून अभिनयात चैतन्य सळसळते.
ज्याप्रमाणे डॉक्टर, इंजीनियर,वकील, आर्किटेक्ट,चार्टर्ड अकाऊंटंट,कंपनी
सेक्रेटरी,सॉफ्टवेअर इंजीनियर आदि पैकी कोणत्याही क्षेत्राचा अभ्यासक्रम
यशस्वीरीत्या पूर्ण करून त्या त्या क्षेत्रात करियर करता येऊ शकते. अगदी तसेच अभिनय
क्षेत्रात देखील रीतसर अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्यापैकी कोणीही एक उत्कृष्ट
अभिनेता अथवा अभिनेत्री होऊ शकतं. हा विचार घेऊन कड्याची सुकन्या चित्रा रविंद्र
कुलकर्णी सध्या (नाशीकला स्थाईक) बाळासाहेब कोंडजकर व स्व.प्रमिलाताई कोंडजकर मॕडम
यांची सुकन्या तर मुख्याध्यापक योगेश कोंडजकर यांची बहिण.. बीड जिल्हा हा
कलावंतांची खाण आहे असे नेहमीच म्हटले जाते.मराठीतील सुपरस्टार अभिनेता मकरंद
अनासपुरे,संदीप पाठक,मिलींद शिंदे, कमलाकर सातपुते,सुरेश विश्वकर्मा,बी.शिवराज, या
कलाकारांनी मराठी रंगभूमी गाजविली आहे. आता या मालिकेत आणखी एक नाव पुढे येत असून
झी मराठीवरील " तुझ्या माझ्या संसारला आणीक काय हव " मध्ये ताई काकीची भूमिका
साकारणारी गुणी व देखणी अभिनेत्री चित्रा रविंद्र कुलकर्णी- कोंडेजकर ही आष्टी
तालुक्यातील कडा येथील रहिवाशी आहे. तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा सुरू सध्या सुरू
आहे. चित्रा कुलकर्णी यांचे माहेर कडा तर सासर हे बीड तालुक्यातील सात्रापोत्रा हे
आहे. लहानपणापासूनच आईकडून अभिनयाचे बाळकडू मिळाले.शिक्षण घेत असताना अहमदनगर येथील
अनेक नाटकात काम करून ती गाजविले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेवून आपल्या
कलेला दाद मिळविली.कलांतराने विवाह झाला आणि चित्रा कोंडेजकर चित्रा रविंद्र
कुलकर्णी झाल्या. पती एअरफोर्समध्ये असल्यामुळे मध्यंतरीचा काळ त्यांना.. अभिनय
करता आला नाही. मालिकेत काम करण्याची संधी चित्रा कुलकर्णी यांना मिळाली आणि पुन्हा
अभिनयाकडे वळाल्या. पतींची बदली नाशिक येथे झाल्यानंतर या ठिकाणी नयना आपटे यांचे
बालनाट्य शिबीरात काम करण्याची संधी मिळाली.नयनाने चित्रातला अभिनय हेरला आणि
तिच्यासोबत काही बालनाट्य रंगभूमीवर साकारले.या काळात झी मराठीचे " तुझ्या माझ्या
संसाराला आणीक काय हवं ". या मालिकेची तयारी सुरू होती. या मालिकेसाठी चित्राने
ऑडीशन दिले आणि तिला ताईकाकीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.या मालिकेने
आतापर्यंत २०० भागांचा टप्पा पूर्ण केला असून रसिकांचे भरभरून प्रेम या मालिकेसाठी
लाभत आहे.याचबरोबर विविध चित्रपटामध्येही छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.बीड
जिल्ह्यातील मातीमध्ये वेगळीच ताकद आहे.ती कोणत्याही क्षेत्रात आपले वर्चस्व सिध्द
करते.त्यामुळे या मालिकेतील ताईकाकीची भूमिका तेवढ्याच ताकदीने चित्राने साकारली
आहे." तुझ्या माझ्या संसाराला " या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये जाता आले आहे.
" चला हवा येऊ द्या " हा हास्यविनीद कार्यक्रमात देखील चित्राचा सहभाग आहे.
सर्वप्रथम कायिक आंगिक अभिनय,वाचिक अभिनय,सात्विक अभिनय,आहार्य अभिनय याविषयी
अभ्यास करणं आवश्यक असतं.या विविध प्रकारांतील अभिनयाचा ताळमेळ नव रसातून निर्माण
झालेले वैशिष्ट्यपूर्ण भावदर्शन एखाद्या अभिनेत्याने अथवा अभिनेत्रीने साकारले तर
त्या अभिनेत्याचा अथवा अभिनेत्रीचा अभिनय हा दीर्घकाळसाठी संस्मरणीय राहतो हे
तितकेच खरं.यासाठी हास्यरस,रौद्ररस, बीभत्सरस,वीररस, शृंगाररस,करूणरस,
वात्सल्यरस,भक्तिरस, भयानकरस अशा नवरसांची निर्मिती करण्याचं कसब अंगिकारणे आवश्यक
असत. चित्रा रविंद्र कुलकर्णी हीचे बी.एस्सी. (झुलाॕजी) पर्यत शिक्षण झाले आहे.
नाट्यशास्त्रातील डिप्लोमा केलेला आहे. नाशिक शहरात स्थाईक झाल्या आहेत. स्टेज:
गाढवाचे लग्न नाटकात गंगु ( गंगू ) अग ऐकलस का, चित्रपट: चांडाळ
चौकडी,वंशवेल,परंतू, गुलदस्ता,गावगाडा (अवॉर्ड),यारोंकी यारी, अंतरवेली, डॅड
चिअर्स, कावकाव कावळे, प्रेमाच्या वाटेवर, दणका, लघुपट- एक थेंब प्रेमाचा (
अवॉर्ड), स्वर्ग,ब्लाइंड लव्ह, मंगळवारी, मॅन्स वर्ल्ड व्यास ऋषी,हॅपी बर्थडे संडे,
( अवॉर्ड ) मालिका: झी टि.व्हि. : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, ताईकाकी,
क्राईम डायरी (ई टि.व्हि.) ,दुर्वा ( स्टार प्रवाह),लक्ष, शेगावचा गजानन, सुंदरा
मनामध्ये भरली, ( कलर्स मराठी ) सह्याद्री - आभाळ आपलं आपलं,बंदी शाळा,श्री स्वामी
समर्थ, अनाकलनीय, (बेस्ट सस्पेन्स अवॉर्ड ) हिंदी - सावधान इंडिया, क्राइम पेट्रोल
या मालिकांत अभिनेत्री चित्रा रविंद्र कुलकर्णी हीचा उत्कृष्ट अभिनय आहे.
********************
0 टिप्पण्या