
आष्टी (प्रतिनिधी)
गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री यांचे जन्मगाव आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी हे छोटेसे गाव आहे.ही खरोखरच पुण्यभूमी आहे असे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे केले.
दौऱ्याच्या निमित्ताने कारखेल खुर्द येथे काल अनावरण झालेल्या लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे यांच्या पुतळ्यास माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आष्टी विधानसभा मतदार संघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आ.भीमराव धोंडे यांनी दि. १९ सप्टेंबर रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत आष्टी तालुक्यातील दौलावडगाव जि.प. गटात जनसंपर्क दौरा केला.गटातील देवळाली, घाटा,पिंप्री,लोखंडवाडी,
म्हसोबाचीवाडी,उंदरखेल,गहूखेल,वेलतुरी, गंगादेवी,अरणविहीरा, कारखेल खुर्द,आंबेवाडी, सालेवडगाव,
नांदुर,वाघळूज इतर गावांचा दौरा केला. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस डाॕ. अजयदादा धोंडे, जि.प.सदस्य सुरेश माळी व इतर कार्यकर्ते दौऱ्याच्या निमित्ताने सोबत होते. माजी आ.भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी वाजत गाजत तोफा वाजवून स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले की, म्हसोबाचीवाडी हे विठ्ठल महाराज यांचे जन्मगाव आहे. गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.महाराजांचे राज्यासह राज्याच्या बाहेर लाखोंच्या संख्येने भक्तगण आहेत. छोट्याशा वाडीत जन्मलेले विठ्ठल महाराज आज गहिनीनाथगड येथे राष्ट्रसंत वामनभाऊ महाराज यांची गादी चालवत आहेत हे खरोखरच वाडीचे भाग्य आहे. सर्वसामान्य माणसाला सुखाचे जिवन जगता यावे असे काम मतदार संघात मी केले आहे. पहिल्या १५ वर्ष आमदार असताना मतदार संघात १ हजार पाझर तलाव केले. त्यानंतर पाझरतलाव झालेच नाहीत. शासनाने कांद्या बाबत चांगला निर्णय घेतला आहे. तरुणांनी मन लावून शिक्षण घेऊन मोठे व्हावे. पहाटे उठून नियमित व्यायाम करावा.डोंगरी भागातील मुले काटक असतात. शिक्षण घेऊन चांगला अभ्यास करीत उच्च पदावर काम करावे.दौऱ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी, माजी जि.प.सदस्य नवनाथ तांदळे,महादेव दानवे,देविदास खाडे, युवराज वायभासे, माऊली शेकडे,भारत मुनोत,माजी सरपंच राधाकिसन सिरसाट, माजी चेअरमन कारभारी घुले,गंगाधर घुले,माजी सरपंच अशोक हजारे, सरपंच संजय विधाते, दिपक विधाते व इतरांची भाषणे झाली.दौऱ्याच्या निमित्ताने देवळालीचे माजी सरपंच नारायणराव जवणे, सरपंच पोपट शेकडे, ॲड.शेकडे यांच्या निवासस्थानी माजी आ. भिमराव धोंडे यांनी भेटी दिल्या. दि. १८ सप्टेंबर रोजी कारखेल खुर्द येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याला माजी आ. धोंडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सालेवडगाव येथील दत्तात्रय घुसाळे या सेवानिवृत्त फौजीचा माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला., म्हसोबावाडी येथील शुभम शेकडे याची बी. ए.एम.एस.साठी निवड झाली.अहिलाजी घुले यांच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली,पोपट सिरसाठ यांचा मुलगा पोलीस झाला त्याबद्दल पालकांचा, प्रदीप औटे यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली म्हणून त्यांचा माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या सभेला माजी जि.प. सदस्य नवनाथ तांदळे, माजी जि.प.सदस्य शिवाजी डोके, माजी सरपंच अशोक हजारे, बाळासाहेब शेकडे, सरपंच पोपट शेकडे, माजी सरपंच भगवान तळेकर,अशोक तळेकर,मल्हारी खाडे, महादेव खाडे ,भारत मुनोत,राजु शेकडे,प्रा. विधाते,सरपंच उद्धव सिरसाट,दशरथ राऊत, सरपंच दादासाहेब जगताप,जे.एस.तांदळे, देविदास खाडे, विनायक राजगुरु,सरपंच संजय विधाते, उपसरपंच पप्पू गवळी, रवि कुलकर्णी,महादेव वायभासे,बलभीम राऊत,मुरलीधर तांदळे, दिलीप तांदळे,सुर्यभान विधाते, मुरलीधर शेकडे, तुळशिराम शिंदे , दादासाहेब शिंदे,दादा राऊत,हनुमान तळेकर, गोकुळ लोखंडे,श्रीरंग तळेकर,लक्ष्मण झांजे, विठ्ठल आमटे,सरपंच अशोक शेकडे,म्हातारदेव शेकडे,ज्ञानदेव शेकडे, बबनराव शेकडे,नारायण सिरसाट, माजी सरपंच राधाकिसन सिरसाट,उमेश डोके, अंबादास हजारे, दासु दहातोंडे,बन्सी हजारे, माजी सरपंच बबन पठाण,बाबासाहेब कराळे,सिदू हजारे, भानुदास गायकवाड, एकनाथ विधाते, मुरलीधर वायभासे, माजी सरपंच जपकर, सागर विधाते,कारभारी घुले,गहिनीनाथ गव्हाणे, दत्तात्रय बोरकर,संदीप पवार,मल्हारी कांबळे, सुभाष हजारे,जयसिंग दहातोंडे,कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या