आष्टी तालुक्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा येथील शिवरत्न गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी
मांडवा येथे एस टी प्रवासी निवारा उभारला आहे .
स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होऊनही आष्टी तालुक्यातील मांडवा या गावांमध्ये एसटी बस आली नव्हती. आष्टी या तालुक्याच्या गावापासून मांडवा हे गाव अवघे आठ किलोमीटर अंतरावर आहे. आंतर राष्ट्रीय धावपटू अविनाश साबळे याच गावातील . गावातील नागरकांनी वारंवार मागणी केल्यामुळे आष्टी मांडवा केरूळ अहमदनगर एस टी बस चालू करण्यात आली.आतापर्यंत गावात एस टी आली नसल्याने प्रवासी निवारा नव्हता. त्यामुळे गावातील शिवरत्न गणेश मंडळाच्याी युवकांनी पुढाकार घेऊन गणेश मंडळाच्या वर्गणीतून गावामध्ये प्रवासी निवारा उभा केला आहे.त्याबद्दल त्यांचे गावामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.या कामांमध्ये मांडवा गावचे मेजर दादासाहेब मुटकुळे,गणेश मुटकुळे,राघव मुटकुळे,प्रसाद नवले,सोमनाथ मुटकुळे,संजय मुटकुळे,लक्ष्मीकांत मुटकुळे,अमोल जाधव ,अमोल मुटकुळे,मनोज मुटकुळे,महादेव नवले,सूरज पवार,राम मुटकुळे आदींनी परिश्रम घेतले आहे .
0 टिप्पण्या