आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी
महाविद्यालयामध्ये दि.२० सप्टेंबर रोजी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे
उद्घाटन दूरदृष्य प्रणालीद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
करण्यात आले. याप्रसंगी दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती महामहीम राज्यपाल
डॉ.सी.पी. राधाकृष्णन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडवणीस,उपमुख्यमंत्री अजित पवार ,मंत्री मंगलप्रभात लोढा हे होते.महाविद्यालयाच्या
कार्यक्रमास्थळी प्रमुख पाहुणे म्हणुन कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती
नामदेव धोंडे,प्राचार्य जे.एम. भंडारी,प्राचार्य महादेव दानवे,प्राचार्य साबळे,
उपप्राचार्य संजय धोंडे, भाजपा बीड जिल्हा सरचिटणीस शंकर देशमुख,जयंत खंदारे
प्रा.डी.व्ही.नवले,जयंत देशमुख,चेअरमन दादासाहेब हजारे, देशमुख नाना,मकरंद
देशमुख,भीमराव जीवे, गौतम सावंत,विष्णू कराळे,दिपक बोराडे, मधु शिरोळे,शिवाजी
पाचे,राजू रासकर उपस्थित होते. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.हरिदास
विधाते म्हणाले की,आचार्य चाणक्य कौशल्ये विकास केंद्र महाविद्यालय स्तरावर स्थापन
झाल्याने पदवी शिक्षण घेता घेता विद्यार्थ्यांना आता कौशल्य विकास शिक्षण मिळणार
आहे.यामुळे विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो.कौशल्य विकास शिक्षणामुळे
मोठ्या प्रमाणावर तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे.त्यामुळे ब-याच प्रमाणात
बेरोजगारी कमी होणार आहे. पारंपारिक शिक्षण आणि आधुनिक शिक्षणाला कौशल्य विकासाची
जोड म्हणून देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आचार्य चाणक्य
कौशल्य विकास व विश्वकर्मा कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी
देशातील १५ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिक पात्र असतील. कौशल्य आत्मसात करून स्वत:चा


व्यावसाय सुरू करू शकतात.या संधीचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन डॉ. सज्जन गायकवाड तर उपप्राचार्य डॉ.भास्कर
चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या