Ticker

6/recent/ticker-posts

शनिवारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आष्टी येथील शासकीय आयटीआय येथे उद्या शनिवार दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यामध्ये आष्टी शहर व परिसरातील विविध शासकीय कार्यालय आस्थापना खाजगी आस्थापना या सहभागी होणार आहेत. शासन निर्णयाप्रमाणे पात्र उमेदवारांना सहा महिने कालावधीच्या कार्य प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण, आयटीआय डिप्लोमा उत्तीर्ण पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असणारे बेरोजगार उमेदवार सहभागी होऊ शकतात.कार्य प्रशिक्षणा दरम्यान बारावी उत्तीर्ण ६ हजार रुपये प्रति महिना आयटीआय डिप्लोमा उत्तीर्ण ८ हजार रुपये प्रति महिना पदवी व पदवी उत्तर परीक्षा उत्तीर्ण १० हजार रुपये प्रति महिना असे विद्यावेतन देण्यात येणार आहे. कार्य प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर अनुभव प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ असावे लागणार आहे.तो बेरोजगार असावा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा अशा इत्यादी अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना या मेळाव्यातून कार्य प्रशिक्षणासाठी निवडण्यात येणार आहे. आष्टीशहर व परिसरातील जास्तीत जास्त शासकीय व खाजगी आस्थापना तसेच बेरोजगार उमेदवार यांनी उपस्थित राहावे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी शासकीय आयटीआय आष्टी बेलगाव रोड एमआयडीसी परिसर आष्टी येथे संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य गणेश हडतगुणे सर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या