आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील हिवरा गावचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार व अहमदनगर दैनिक सकाळचे अनिल लगड यांची अहमदनगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली.अत्यंत चुरशीने व खेळीमेळीच्या वातावरणात गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह प्रेस फ्रंट (पीपीएफ) पॅनलचे १७ पैकी १४ उमेदवार निवडून आले. तर डेमॉक्रॅटिक मीडिया फ्रंटचे (डीएमएफ) तीन उमेदवार निवडून आले. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून चोख काम बजावले. अनिल लगड हे गेल्या ३८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी लोकमत, लोकयुग, सार्वमतमध्ये संपादकीय विभागात विविध पदावर आष्टी, अहमदनगर, बीड, श्रीरामपूर, कोपरगाव, छत्रपती संभाजीनगर येथे काम केले. सध्या ते अहमदनगर येथे सकाळमध्ये कार्यरत आहेत. नवनिर्वाचीत अध्यक्ष अनिल लगड यांचे आष्टी तालुका पत्रकार संघाने अभिनंदन केले.
0 टिप्पण्या