आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोष्ट आॕफीससमोर बोंदार्डे बंधूंचा चहा चांगलाच चर्चिला जात आहे.याठिकाणी
अमोल व अभय बाळासाहेब बोंदार्डे या बंधूंचा आदर्श घ्यावा असा आहे शिवाय सगळ्या आष्टीकरांचे लक्ष या दोघांनी वेधलं आहे.तुम्हांला फ्रेश व्हायचं असलं ना..? तर मग या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोंदार्डे बंधूंचा चहा मिळतो.. चहाचा आस्वाद घ्यायचा तर याच ठिकाणी यावे लागते शिवाय कुठेही ऑर्डर घेऊन जायला त्यांना वेळ नाही.. त्यामुळे सगळ्यांना इकडेच यावं लागतं..कोणीही कितीही घाई केली तरी त्याच्या चहाची चव निर्माण
झाल्याशिवाय चहाचं आधणं बंद होत नाही.. शुद्ध म्हशीचे दुधापासून तयार केलेल्या आणि त्यामध्ये अद्रक घातलेला हा चहा आष्टी शहरातला सर्वात लज्जतदार चहा म्हणून ओळखला जातो.वडील स्व.बाळासाहेब बोंदार्डे यांनी गेल्या २५ वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला.मात्र दुर्दैवाने त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.वडिलांची शिकवण आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन पुढे हा व्यवसाय अमोल आणि अभय या दोघांनी पुढे नेण्याचे काम केले आणि अपार कष्टाच्या बळावर त्यांनी नाव लौकिक मिळवलाय.. एका कपाला केवळ पाच रुपयाचा भाव शिवाय चविष्ट आणि प्रसन्न करणारी टेस्ट असल्यामुळे लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय सध्या दररोज अंदाजे ते ५०० कप चहा विक्री करत आहेत.ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे लवकरच किमान दररोज एक हजार कप चहा विक्रीचा त्यांचा प्रयत्न आहे.अत्यंत शांत आणि विनम्र स्वभावाचे अमोल व अभय बोंदार्डे आहेत..आष्टी शहरातील या युवकापासून प्रेरणा घ्यावी.असा त्याचा चहा विक्री व्यवसायाचा प्रवास आहे.आज माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे,व्यापारी नवीन कासवा,माजी सरपंच नामदेव राऊत,पोपटराव घुले,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,सय्यद शफीभाऊ,शेख आदिनी चहाचा आस्वाद घेतला.
0 टिप्पण्या