

आष्टी (प्रतिनिधी )
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आज रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी रुक्मिणी माधव मंगल कार्यालयात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भगवान महाविद्यालयाचे आदर्श महाविद्यालय म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार प्राचार्य दत्तात्रय वाघ तर उत्कृष्ट शासकीय सेवा म्हणून डॉ. सुनील गदादे,आदर्श पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार पत्रकार अक्षय विधाते यांना आज पुरस्कार वितरण होणार आहे. शेतकरी शिक्षण महाविद्यालय प्रसारक मंडळ संचलित भगवान महाविद्यालय या महाविद्यालयाने आतापर्यंत अनेक विद्यार्थी उत्कृष्ट प्रकारे घडवले आहेत. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करत आहेत त्या महाविद्यालयाच्या कार्याची दखल घेऊन प्राचार्य दत्तात्रय वाघ यांना आदर्श महाविद्यालय म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. पशु सेवेमध्ये कार्यरत असलेले पशु सेवा हीच ईश्वर सेवा मानून प्रामाणिकपणे काम करून आपल्या उल्लेखनीय कार्यातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी व पशुधन वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे डॉ. सुनील गदादे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शासकीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन शासन दरबारी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे याबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय असं नाव असलेले पत्रकार अक्षय विधाते यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या