
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी
महाविद्यालयामध्ये मंगळवार दि.३ ते ५ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय परिषदांचे आयोजन
करण्यात आले आहे. राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ
साताराचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव मस्के यांच्या हस्ते झाले आहे. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. भीमराव धोंडे उपस्थित होते.
बीजभाषण म्हणून प्रोफेसर सय्यद अझरुद्दीन वाणिज्य विभाग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर उपस्थित होते.आज बुधवार दि.४ संप्टेंबर रोजी
भाषा, सामाजिकशास्त्रे व ग्रंथालय विषयाचे परिषद संपन्न होणार आहे.या परिषदेचे
उद्घाटन प्रोफेसर व्यंकटेश लांब व्यवस्थापन परिषद सदस्य,डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते होणार आहे अध्यक्षस्थानी
संस्थेचे सहसचिव युवा नेते अजयदादा धोंडे,सिनेट सदस्य,डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर तर बीजभाषण प्रोफेसर शाम सिरसाट, प्र.कुलगुरू डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक
धोरण-२०२० कौशल्ये विकास व रोजगाराच्या संधी, सामाजिक शास्त्रातील आधुनिक संशोधन:
दर्जा, भविष्य आणि प्राधान्य या विषयावर राष्ट्रीय परिषद होणार आहे. गुरूवार दि. ५
संप्टेंबर २०२४ रोजी विज्ञान शाखेची राष्ट्रीय परिषद होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या
या परिषदेत प्राध्यापक, संशोधक विद्यार्थीनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य
डाॕ.हरिदास विधाते यांनी केले आहे.
0 टिप्पण्या