आष्टी (प्रतिनिधी)
गुरव समाजाच्यावतीने १७ नोव्हेंबर रोजी आष्टी येथे सामूहिक उपनयन संस्कार कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे.गुरव समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन आष्टी तालुका गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष भीमराव गुरव यांनी केले आहे.
करण्यात आले आहे.गुरव समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन आष्टी तालुका गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष भीमराव गुरव यांनी केले आहे.
गुरव समाजातील बटूंचे उपनयन संस्कार हा महत्त्वपूर्ण विधी मानला जात.या विधीसाठी गुरव समाज बांधवांनी नावनोंदणी करून अनावश्यक खर्च टाळण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी सामुदायिक रित्या घेतला जात असल्याचे सांगत या कार्यक्रमांमध्ये सकाळी बटूंच्या केसाचे चौल,बटूंचे स्नान, मातृभोजन, बटूंची देवदर्शन दिमाखदार मिरवणूक, मोंजीचा कार्यक्रम, स्नेहभोजन, होम हवन भिक्षावळ इत्यादी धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील.ही कार्यक्रम आष्टी येथील जोगेश्वरी मंगल कार्यालय खडकत रोड येथे होणार आहे. यासाठी नोंदणी शुल्क १ हजार ५०० रुपये आहे. ज्या बटूंची उपनयन संस्कार केले जाणार आहेत त्या सर्व बटूंना संस्थेमार्फत कद,संध्याची पळी,ताम्हण गडवा,भिक्षावळीचे सामान व स्मृतीचिन्ह दिले जाणार आहे. गुरव समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन आष्टी तालुका गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष भीमराव गुरव,उपाध्यक्ष बापूराव क्षीरसागर,सचिव राम शिर्के,सहसचिव राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.

0 टिप्पण्या